शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

शिक्षकाची शिवीगाळ

By admin | Updated: August 18, 2016 02:00 IST

न्यायडोंगरी : मद्यप्राशन केल्याचा आरोप

न्यायडोंगरी : नांदगाव तालुक्यातील सावरगाव येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक संदीप पाटील यांनी इयत्ता सातवीच्या वर्गातच मद्यप्राशन करून विद्यार्थ्यांशी अरेरावी केल्याने पालकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. शालेय समिती अध्यक्ष प्रकाश शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक पालकांनी संबंधित शिक्षकाविरुद्ध शाळेचे मुख्याध्यापकांकडे लेखी तक्र ार केली आहे.सावरगाव येथे जिल्हा परिषदेची पहिली ते सातवीपर्यंत शाळा असून, शिक्षक संदीप जगतसिंग पाटील यांची सातवीचे वर्गशिक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. शुक्रवारी (दि. १२) दुपारच्या सुटीदरम्यान सर्व विद्यार्थी वर्गाबाहेर गेले असता वर्गशिक्षक पाटील यांनी वर्गखोलीतील खुर्चीवर बसून दारू पिण्याचा सपाटा लावला. सुटीची वेळ संपल्यानंतर सर्व विद्यार्थी वर्गात आले असता त्यांना पाटीलसर दारू पित असल्याचे दिसून आले. मद्यधुंद झालेल्या शिक्षकांने विद्यार्थ्यांना पाहून त्यांना शिवीगाळ करीत वर्गाबाहेर काढले. विद्यार्थी भयभीत होऊन शाळा सुटण्याची वाट पाहत गुपचूप बसले होते. शाळा सुटताच विद्यार्थ्यांनी घरी जाऊन पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी शाळेकडे धाव घेतली. परंतु तोपर्यंत कर्मचारी व शिक्षकवर्ग शाळा बंद करून निघुन गेले होते. शेवटी पालकांना त्या दिवशी निराश होऊन घरी परतावे लागले. परंतु बुधवारी सकाळी ८ वाजता पालक व संतप्त नागरिकांचा मोठा समुदाय शाळेच्या आवारात जमा झाला होता. मात्र पाटीलसर शाळेकडे फिरकलेच नाहीत. शेवटी उपस्थित व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांसह पालकांनी पाटील विरुद्ध लेखी तक्रार करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधला. जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी येऊन घटनेची पाहणी करीत नाहीत तोपर्यंत सदरची वर्गखोली उघडण्यात येणार नाही, असा पवित्रा घेत संबंधित शिक्षकावर कारवाई करून त्यांची त्वरित च बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. (वार्ताहर)