शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

श्रीविसर्जन मिरवणूकीत अवाजवी आवाज़़

By admin | Updated: September 11, 2014 00:17 IST

श्रीविसर्जन मिरवणूकीत अवाजवी आवाज़़

  प्रतिनिधी  नाशिक, दि. १० - सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाबाबत दिलेल्या आदेशात शांतता क्षेत्रामध्ये दिवसा ५० डेसीबलपेक्षा जास्त आणि रात्री ४० डेसीबलपेक्षा जास्त, रहिवासी परिसरात दिवसा ५५ डेसिबलपेक्षा जास्त व रात्री ४५ डेसिबलच्या पुढे वातावरणातील ध्वनींची पातळी जाणार नाही, याची दक्षता घ्यावी असे म्हटले आहे़ तसेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई करावी असे म्हटले आहे़ मात्र न्यायालयाचा हा आदेश व ध्वनिप्रदूषणाविरोधात गेले काही दिवस सातत्याने सुरू असलेल्या प्रबोधनात्मक चळवळीकडे कानाडोळा करून नाशिकमधील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अनंत चतुर्दशीच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आवाजाच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे़मंडळांचा दिखावूपणाकडे कल़़प्रचंड आवाजाने भिंत कोसळून भाविकांचा मृत्यू ही भयानक घटना आहे. आवाजाची मर्यादा आपण ओलांडून कोणासाठी हे सर्व करतोय याचे भान सुटले असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. भक्तीभाव आणि समाजासाठी भरीव कार्य करण्याचे मुख्य उद्दीष्ट असणे गरजेचे असताना केवळ दिखावूपणा करण्याकडे वाढलेला कल पाहून असे उत्सव नसलेले बरे अशीच भावना मनात दाटून येते. कुणासाठी आणि कशासाठी हे जर सांगण्याची वेळ आली तर अज्ञानाची कमाल आहे. त्यापेक्षा आपण हा उत्सव कसा साजरा करतो हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला आणि आपल्या गल्लीतील कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे. - विजय जानोरकर, म्हसरूळ, नाशिक़प्रत्येकाने विचार करायला हवा़़़मोठा आवाज म्हणजे आनंद हि अंधश्रधाच नाही का ? कोणत्या पोथीत असे लिहिले आहे? अरे ! वाचवा रे हिंदू धर्म, अशा वेड्या लोकांपासून, जे स्वत:ला, धर्म रक्षक समजतात! खरे तर हे लोक धर्म राक्षस आहेत. डॉल्बीचा आवाजावर कायद्याने नियंत्रण का असत नाही? डॉल्बी उत्पादन, विक्र ी आणि वापर यावर कडक बंधने आणायला हवे़ आपण नक्की कुणासाठी आणि कशासाठी हा उत्सव करतो या प्रश्नाचा प्रत्येकाने विचार करायला हवा?- सोमनाथ खैरनार, जेलरोड, नाशिक रोड़नागरिकांची मानसिकता नाही़़़डीजेमुळे त्रासच अधिक होतो, विशेषत: हृदयरोग असणाऱ्यांना तर विशेष काळजी घ्यावी लागते़ त्यामुळे डीजेच्या वापरावर त्वरित बंदी आणून त्याची कडक अंमलबजावणी करायला व्हावी. साताऱ्यासारख्या आपण अजून किती जणांच्या आरोग्याला धोका होण्याची वाट बघणार आहोत? सर्वोच्च न्यायालयाने सर्वच उत्सवांसाठी तयार केलेल्या नियमावलीचे काटेकोर पालन करणे खूप महत्वाचे आहे. मात्र दुर्दैवाने नागरिकांमध्ये शिस्तीची खूप कमतरता आहे. त्यामुळे कदाचित आपण मागे आहोत. - सुजीत वडजे, म्हसरूळ, नाशिक़नवीन नियमावलीची आवश्यकता़़़सातऱ्यातील घटना ही नक्की डिजेच्या आवाजामुळे घडली की आणखी कुठल्या कारणामुळे हे तपासाअंती समोर येईल़ तसेच डिजेच्या प्रचंड आवाजामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होतात हे मात्र खरे आहे़ साताऱ्याच्या घटनेवरून अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी डिजेसाठी नव्याने नियमावली तयार करण्याची आवश्यकता आहे़- विनायक शिंदे, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडऴ