शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

श्री त्र्यंबकेश्वर चरणी तीन लाख भाविक नतमस्तक यंत्रणेची धावपळ : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्र्यंबकला तळ ; सायंकाळनंतर वाढली गर्दी

By admin | Updated: August 12, 2014 01:09 IST

श्री त्र्यंबकेश्वर चरणी तीन लाख भाविक नतमस्तक यंत्रणेची धावपळ : विविध विभागाच्या अधिकाऱ्यांचा त्र्यंबकला तळ ; सायंकाळनंतर वाढली गर्दी

त्र्यंबकेश्वर : येथील ज्योतिर्लिंग मंदिरात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पोलीस, नगरपालिका, वीज वितरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालय, सेवाभावी संस्था आणि खासगी वैद्यकीय यांनी सुविधा दिल्या.तिसरा श्रावणी सोमवार म्हणजे यंत्रणांना डोकेदुखी ठरते. रात्रभर अधिकारी वर्ग त्र्यंबकेश्वरला तळ ठोकून होता. रविवारी आदल्या दिवशी नेहमी गर्दीचा उच्चांक मोडला जातो. यावर्षी सायंकाळी ४ वाजेपर्यंत गर्दी नव्हती. त्यानंतर मात्र गर्दीत वाढ झाली. एस.टी.च्या दुपारपर्यंत ३०७ फेऱ्या झाल्याचे परिवहन अधिकाऱ्यांनी सांगितले. स्वत: विभाग नियंत्रक यामिनी जोशी त्र्यंबकला तळ ठोकून आहेत. परिवहन महामंडळाने ४०० गाड्यांचे नियोजन केले आहे. त्यामुळे उद्यापर्यंत निश्चित आकडा भाविकांचा मिळू शकेल. पोलिसांनी काल खंबाळे येथे केलेला बंदोबस्ताचा अतिरेक वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. स्वत: पोलीस अधीक्षक ग्रामीण संजय मोहिते, अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, त्र्यंबकचे पोलीस अधिकारी आदिंनी व्यवस्थित नियोजन केले.त्र्यंबकचे उपविभागीय अधिकारी (प्रांत) बाळासाहेब वाघचौरे, तहसीलदार नरेशकुमार बहिरम आदि तळ ठोकून होते, तर नगराध्यक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, सर्व कर्मचारी दोन दिवस सुटी असूनही सेवा बजावत होते.दरम्यान, आज दुपारी २.३० वाजता देवाची पालखी निघाली आणि कुशावर्त तीर्थावर नेण्यात आली. भगवान त्र्यंबकराजाच्या पालखीबरोबर हजारो लोक सामील झाले होते. तिसरा श्रावण सोमवार म्हणजे भाविकांना जणू दर्शनाची पर्वणी असते. दुकानदार, टपरीवाले, छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांना थोडाफार तोटा मिळाला. पावसाचे सातत्य मात्र टिकून असताना परिक्रमा रस्ता सीमेंट काँक्रिटचा असल्यामुळे काहींना सुखदायी वाटला. तर काहींना त्रास जाणवल्याचे दिसून आलेत. थंडी, ताप, गुडघे, पाय आदिंचा त्रास झालेल्यांनी आज त्र्यंबक ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेतले, तर काही रुग्ण थंडी, ताप तसेच दमा विकार असलेले दाखल झालेले आहेत. ते उपचार घेत असून, यात नगर, जालना, अकोला आदि गावांचे रुग्ण आहेत. डॉ. अशोक मते, डॉ. भागवत लोंढे, डॉ. विठ्ठल काळे व अन्य १० ते १५ वैद्यकीय अधिकारी रुग्णांवर उपचार करीत असून, दुसरीकडे रेड स्वस्तिक या सेवाभावी संस्थेचे फिरते रुग्णालय पुरेशा औषध खजिन्यासह व सुमारे १५ डॉक्टरांचे पथक परिक्रमा रस्त्यावर पाय खरचटलेले, दम्याचा अटॅक आलेले, चक्कर आलेले रुग्ण औषधांचा लाभ घेत होते. पथकप्रमुख राजेश सोनवणे व्यवस्था पाहत होते. गावात ठिकठिकाणी पेढ्यांचे, खजुराचे, चहा, दूध, फळे आदिंच्या हातगाड्या ठिकठिकाणी लागल्याने त्यांचा चांगला खप झाला. पेढे, खिचडी, साबुदाणा वडे यांनाही चांगली मागणी होती. त्यातही या सर्व वस्तूंचे भाव गगनाला भिडले असूनही खप बऱ्यापैकी झालेला दिसून आला. काही सेवाभावी संस्थांनी खिचडी वाटप केले. त्र्यंबक पालिकेतर्फेही नगराध्यक्षांच्या हस्ते खिचडी वाटप करण्यात आली. (वार्ताहर)