शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

उद्दाम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:15 IST

उद्दाम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा

येवला : कार्यालयीन वेळेत अधिकाऱ्यांचे मद्यपान प्रकरणलोकमत न्यूज नेटवर्कयेवला : पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी गावाला भेटीसाठी जात असल्याचे सभापतींना दूरध्वनीवरून सांगून ते हॉटेलमध्ये कार्यालयीन वेळेत मद्यपान करीत बसल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघडकीस आणताच ‘त्या’ उद्दाम अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. मंगेश भगत व मोहन शेलार पंचायत समितीत आले असता अनंत यादव व प्रशांत वास्ते यांची वाट पाहत लोक थांबलेले होते. दुपारी ४ वाजले तरी एकही अधिकारी कार्यालयात आला नाही. नायगव्हाणचे माजी सरपंच अशोक सदगीर यांनी सभापती कक्षात येऊन संबंधित दोन अधिकारी शहरातील हॉटेलमध्ये मद्यप्राशन करत असल्याचे गटनेते भगत व शेलार यांना सांगितले. सदर बाबीची सभापती साळवे यांना कल्पना दिल्यावर त्यांनी सहायक गटविकास अधिकारी व प्रशासन अधिकारी यांना सोबत घेऊन तक्रारदारासह संबंधित हॉटेलमध्ये जाण्यास सांगितले. लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी हॉटेलला भेट दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन कृषी अधिकारी प्रशांत वास्ते व मनेरेगाचे विस्तार अधिकारी आनंद यादव यांना गुरु वारी गटविकास अधिकारी सुनील आहिरे यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सभापतीसह सर्व सदस्यांनी गुरु वारी जिल्हा परिषद अध्यक्षा व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या बाबतची तक्र ार केली आहे. यावर २१ जुलै पर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांनी या शिष्टमंंडळाला दिले आहे. यादव व वास्ते यांनी सेवा नियमाचा भंग केल्याने सेवेतून निलंबित का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करून तीन दिवसात खुलासा सादर करावा, असे या नोटिसीत म्हटले आहे. दोषींवर कारवाइची, जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनाही हालचाल नोेंद करण्याची सक्ती करण्याची मागणी बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार यांनी केली आहे.