शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

नांदगावी मंजूर मागणीपेक्षा जास्त युरिया मिळूनही टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 00:15 IST

नांदगाव : तालुक्यासाठी मंजूर मागणीपेक्षा १७८१ टन जादा युरिया मिळूनही टंचाईला तोंड देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. खतविक्रे ते मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याची ओरड करत आहेत, तर शेतकरी पिकांना युरियाची मात्रा देण्यास उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होईल म्हणून चिंताग्रस्त आहेत.

नांदगाव : ( संजीव धामणे ) तालुक्यासाठी मंजूर मागणीपेक्षा १७८१ टन जादा युरिया मिळूनही टंचाईला तोंड देण्याची वेळ आल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. खतविक्रे ते मागणीपेक्षा कमी पुरवठा होत असल्याची ओरड करत आहेत, तर शेतकरी पिकांना युरियाची मात्रा देण्यास उशीर झाल्यास उत्पन्नावर परिणाम होईल म्हणून चिंताग्रस्त आहेत. खते कमी पडत असतील तर कृषी विभागाने कोणत्या आधारावर खतांची मागणी नोंदविली हा संशोधनाचा विषय आहे. या आठवड्यात झालेल्या पावसाने पिके तरारली आणि शेतकरी खूश होऊन युरिया खरेदीसाठी बाजारात गेला असता, युरियाची टंचाई झाल्याने त्याच्या आनंदावर पाणी पडले आहे. खतविक्रेत्याकडे गेले की, मागणीपेक्षा कमी गोण्या घेण्याचा आग्रह होत आहे.पिके अधिक जोमाने मागणीपेक्षा जास्तीचा युरिया मिळूनसुद्धा टंचाई कशी, यात कोणाचे चुकले की वेगळे काही घडले याचे गौडबंगाल आहे. युरियात एन (नायट्रोजन) पी (फॉस्फरस) के (पोटॅशियम) हे घटक ४६:०:० असे असतात. नायट्रोजनमुळे प्रकाशसंश्लेषण क्रि या गतिमान होते. त्यामुळे पीक दमदार होते. वनस्पतींमध्ये हिरव्या पानाची वाढ व हिरवा गर्द रंग युरियामुळे येतो. युरिया मारल्यानंतर पीक अधिक जोमाने येते.कृषी विभागाकडून 5215 टन युरिया

युरियाची तालुका कृषी खात्याने खरीप हंगामासाठी नोंदवलेली मागणी ४९८१ टन आहे. मंजूर झालेला युरिया ३४३४ टन. प्रत्यक्ष मिळालेला युरिया ५२१५ टन. मग टंचाई कशामुळे निर्माण झाली. मागणीपेक्षा २३४ टन युरिया अधिक मिळाला. यात कृषी विभागाने मागणी कमी केली की युरियाला वाट फुटली अशी चर्चा होत आहे.-------------------शासकीय अनुदान असल्याने १२०० रुपयांची युरियाची गोणी २६६ रुपयांना मिळते. परंतु काही खतांसाठी १०७५ ते ११५० रुपये मोजावे लागतात. म्हणून युरियाची मागणी वाढली आहे. इतर खते न वापरल्यामुळे मका पिकावर स्फुरद, लोह, झिंक यांची कमतरता जाणवत आहे. - जगदीश पाटील, तालुका कृषी अधिकारी

टॅग्स :Nashikनाशिक