शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाचा शेतीला फटका

By admin | Updated: May 6, 2017 23:19 IST

वणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : भारनियमनाव्यतिरिक्त आपत्कालीन भारनियमन वितरण कंपनीने सुरू केल्याने शेती उद्योगधंदे, पाणीपुरवठा योजना यावर प्रतिकूल परिणाम होत असून, वीजनिर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठ्यात घट व कोळशाच्या टंचाईमुळे होणाऱ्या अडचणीचे कारण वितरण कंपनीने पुढे केले आहे.एकलहरे विद्युत केंद्रातून ओझर-दिंडोरी-वणी-सुरगाणा असा वीजप्रवाह दिंडोरी व सुरगाणा तालुक्यात करण्यात येतो. दिंडोरी येथे १३२ केव्ही क्षमतेचे विद्युत केंद्र असून, वणी ३३ केव्ही, पिंप्री ३३ केव्ही, करंजखेड ३३ केव्ही, सुरगाणा ३३ केव्ही अशा क्षमतेच्या उपकेंद्रातून विद्युत पुरवठा करण्यात येतो. विजेची मागणी व पुरवठा यात समन्वय राहिला नसल्याने नाइलाजाने ग्रामीण भागात भारनियमन वितरण कंपनीला सुरू करावे लागले़ विद्युत निर्मितीसाठी आवश्यक जलसाठा व कोळशाच्या टंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम होत असल्याने नाइलाजाने भारनियमन करावे लागत असल्याची वितरण कंपनीची भूमिका आहे. दरम्यान, दिवसेगाणिक शेती घरगुती व्यापारी औद्योगिक वीज ग्राहकाकडून वीजजोडणीची मागणी वाढली आहे. ग्राहकांची वाढणारी संख्या व वीजनिर्मिती यांचे समन्वयात्मक गणित जुळत नसल्याने आपत्कालीन भारनियमनाचे अस्र वितरण कंपनीने बाहेर काढले आहे. वीजग्राहकाचे समाधान करता करता वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांची दमछाक झाली असून, सद्यस्थिती पाहता आपत्कालीन भारनियमन शहरी भागात व ग्रामीण भागातील भारनियमनात वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येतो आहे.