नाशिकरोड : कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त सायंकाळी काढण्यात आलेली शोभायात्रा उत्साहात पार पडली.कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त रेल्वे मालधक्का येथे रिपब्लिकन फेडरेशन, सुभाषरोड मित्रमंडळाच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रतिमापूजन करण्यात आले. तसेच मातोश्री रमाबाई आंबेडकरनगर येथील समाजमंदिरामध्ये भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची स्थापना व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. रेल्वेस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सायंकाळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विलासराज गायकवाड यांच्या हस्ते झाले. सदर शोभायात्रा सुभाषरोड, सत्कार पॉइंट, बिटको, शिवाजी पुतळा, देवी चौकमार्गे आंबेडकर पुतळ्यापर्यंत काढण्यात आली होती. शोभायात्रेमध्ये नगरसेवक सुनील वाघ, सूर्यकांत लवटे, प्रकाश पगारे, समीर शेख, भारत निकम, रामबाबा पठारे, गणेश काळे, राजू वानखेडे, अशोक रोहम, किशोर खडताळे, बाळासाहेब जाधव, सुभाष आहिरे, किशोर कटारे, रवि गजरमल, संतोष पाटील आदि सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
गायकवाड जयंतीनिमित्त नाशिकरोडला शोभायात्रा
By admin | Updated: October 17, 2015 22:10 IST