शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धक्षेत्र गजपंथ येथे शोभायात्रा

By admin | Updated: April 20, 2016 00:10 IST

जन्मकल्याणक महोत्सव : सकल जैन समाजाच्या वतीने सोहळा

नाशिक : म्हसरूळ येथील श्री दिगंबर जैन सिद्धक्षेत्र गजपंथ येथे भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोल-ताशांच्या निनादात आणि प्रचंड जल्लोषात शोभायात्रा काढण्यात आली. शिवाय दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. जैन धर्मियांचे तिसऱ्या क्रमांकाचे सिद्धक्षेत्र असलेल्या गजपंथ येथे सकल जैन समाजाच्या वतीने भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक महोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. पंचरंगी जैन ध्वजपताकांनी मंतरलेल्या वातावरणात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ढोल पथक आणि भजनी मंडळाच्या सहभागातून तपस्वी साधूगण रविनंदीजी आणि विप्रणसागर महाराज ससंघ यांच्या सान्निध्यात शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी भगवान महावीरांची प्रतिमा असलेली पालखी होती. सजविलेल्या बग्गीतून इंद्र आणि इंद्राणी मनोज व राखी पाटणी, त्यांचे माता-पिता राजेंद्र व त्रिशलादेवी पाटणी यांच्यासह शोभायात्रेत मोठ्या संख्येने जैन समाज सहभागी झाला होता. महिलांनी केशरी साडी तर पुरुषांनी शुभ्र कुर्ता-पायजमा व फेटा परिधान केला होता. वाजत-गाजत निघालेल्या या शोभायात्रेत भगवान महावीरांचा जयघोष करण्यात आला. दरम्यान, उपस्थितांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेची सांगता म्हसरूळ येथील दिगंबर जैन मंदिर याठिकाणी झाली. यावेळी १०८ कलशांतून भगवान महावीरांच्या मूर्तीवर जलाभिषेक व पंचामृत मस्तकाभिषेक करण्यात आला. प्रसादी भंडाऱ्याचे आयोजन अनुप जैन यांनी केले होते. त्यानंतर मुनिश्रींचे प्रवचन झाले. दुपारच्या सत्रात मान्यवरांना सन्मानित करण्यात आले, तर सायंकाळच्या सत्रात भगवंतांच्या पाळण्याचा कार्यक्रम भावभक्तिपर वातावरणात पार पडला. त्यानंतर जन्मकल्याणक आधारित नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)