शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
"राक्षसी विचारसरणीचे लोक", पाकिस्तानवर संतापला सुनील शेट्टी, 'बॉयकॉट तुर्की'वरही दिली प्रतिक्रिया
4
"माझ्या सासरचे मला मारताहेत, मला वाचवा"; ४ महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, आता उचललं टोकाचं पाऊल
5
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
6
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
7
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
8
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
9
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
10
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
11
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
12
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
13
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
14
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
15
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
16
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
17
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
18
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
19
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
20
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच

शिवसेनेची भूमिका निर्णायक

By admin | Updated: January 31, 2017 01:15 IST

पदवीधर निवडणूक : कॉँग्रेसच्या पथ्यावर; भाजपाला मारक

श्याम बागुल : नाशिकप्रचाराच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन ठेपलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्यात शिवसेनेने भाजपाशी युती तोडण्याच्या केलेल्या घोषणेमुळे या निवडणुकीची सारी राजकीय गणितं बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, शिवसेनेने भाजपाला मदत न करण्याचे जाहीर करून कोणाच्या बाजूने कौल देणार हे गुलदस्त्यात ठेवल्यामुळे ज्याप्रमाणे कॉँग्रेस उत्साहित झाली आहे, अगदी त्याच धर्तीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रचारातून अंग काढून घेतल्याने भाजपालाही हायसे वाटले आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा काहीशा वेगळ्या वळणावर पोहोचलेल्या या निवडणुकीने अखेरच्या क्षणी उत्कंठा वाढविली आहे.  पारंपरिकपणे भाजपाच्या ताब्यात असलेल्या हा मतदारसंघ सात वर्षांपूर्वी कॉँग्रेसने आपल्याकडे खेचून घेत डॉ. सुधीर तांबे यांच्या ताब्यात दिला असून, आत्ताही निवडणुकीच्या रिंगणात शिक्षक लोकशाही आघाडीच्या पाठिंब्यावर कॉँग्रेसकडून तांबे हेच रिंगणात आहेत, तर भाजपाने गेल्या दोन निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. प्रशांत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. वरकरणी या दोन्ही पक्षांमध्येच ही लढत दिसत असली तरी अन्य राजकीय पक्षांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राज्यात कॉँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी केल्यामुळे डॉ. तांबे यांच्या पाठीशी राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने उभी राहण्याची व्यक्त केलेली अपेक्षा फोल ठरली आहे. त्यामागच्या अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीत कॉँग्रेसने आघाडी करण्यासाठी चालविलेली टाळटाळ हे होय. त्यामुळे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते अंग मोडून प्रचारात सहभागी झालेले दिसत नाहीत, त्यामागे आणखी दुसरे कारण म्हणजे तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याकडून अद्याप कार्यकर्त्यांना निरोप आलेला नाही. या दोन्ही बाबी डॉ. तांबे यांच्या अडचणी वाढविणाऱ्या व भाजपाला उत्साहित करणाऱ्या असल्या तरी, शिवसेनेने भाजपाबरोबर तोडलेल्या युतीमुळे कॉँग्रेसला हायसे वाटणे स्वाभाविक आहे. सेना-भाजपात सध्या असलेले वैर पाहता, भाजपाच्या पराभवासाठी सैनिक त्वेषाने पेटून उठतील अशीच रणनिती कॉँग्रेसने आखली आहे. त्यामुळे शिवसेनेची भूमिका जशी भाजपासाठी महत्त्वाची आहे, तशीच ती कॉँग्रेससाठीही तितकीच आशादायी आहे.  या निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असून, दोन्ही पक्षांनी मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे दावे करून स्वत:ची समजूत काढण्याचा प्रयत्न चालविला असला तरी, निवडणुकीच्या रिंगणात  तिसऱ्या आघाडीचे कॉ. प्रकाश देसले यांनीदेखील कॉँग्रेस व भाजपापुढे पर्याय उभा केलेला आहे.या निवडणुकीच्या माध्यमातूनच भविष्यातील शिक्षक मतदारसंघाचेही  भवितव्य अजमाविले जाणार असल्याने राजकीय पक्षांनी त्या दृष्टीने या निवडणुकीकडे पाहण्यास सुरुवात केली आहे. घोडा मैदान जवळच असून, केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाला मतदार अनुकूलता दर्शवितात की, सरकारवरील नाराजीतून कॉँग्रेसला जवळ करतात हे लवकरच स्पष्ट होणार आहे.