शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुनसागर (पुनंद) मधून जलवाहीनीद्वारे पाणी नेण्यास शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 19:04 IST

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरु देणार नाही असा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देकळवण : जलवाहिनीचे साहित्यही तालुक्यात उतरु देणार नाही ; मत्र्यांची घेतली शिष्टमंडळाने भेट

कळवण : सटाणा नगरपालिकेच्या पुनंद प्रकल्प पाणी पुरवठा योजनेचे १० फेब्रुवारी रोजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूमिपूजन करु न योजना मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेच्या कळवण तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध करु न जलवाहिनीचे पाईप तालुक्यात उतरु देणार नाही असा इशारा दिला आहे.दरम्यान या योजनेला विरोध करण्यासाठी शिवसेनेचे विधीमंडळाचे नेते, सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील, तालुका प्रमुख अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली कळवण तालुक्यातील शिष्टमंडळाने भेट घेऊन जलवाहिनी संदर्भात निवेदन देऊन विरोध दर्शवला आहे.या योजनेमुळे तालुक्यातील जनतेचे होणाºया नुकसानाची माहिती देऊन या प्रकल्पासाठी ज्या शेतकरी बांधवांनी जमीनी दिल्या त्यांना या प्रकल्पातील पाण्याचा अद्याप लाभ झाला नाही, त्यामुळे कळवणच्या जनतेसाठी पुनंद प्रकल्पातील पाणी प्रथम आरक्षित करा अशी मागणी शिवसेनेने करु न शिंदे यांचे लक्ष वेधले व पाणी प्रश्नांवर शिष्टमंडळाने चर्चा केली.एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपण भेट घेऊन जलवाहिनी संदर्भात कळवण तालुक्यातील जनतेचा असलेला विरोध व तालुक्यासाठी प्रथम पाणी आरक्षित करणे आदी मागण्या संदर्भात व जनतेच्या भावना लक्षात आणुन देवू व जनतेच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेण्यास विनंती करु अशी ग्वाही यावेळी शिष्टमंडळाला दिली.कळवण तालुक्यातून जनतेचा विरोध डावलून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाणी पुरवठा योजना मार्गी लावण्याची घोषणा केल्यानंतर सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने कळवण तालुक्यातून विरोध दर्शवून थेट मंत्रालयात धाव घेऊन विरोध केला आहे. कळवण तालुक्यातील जनतेचा रोष पत्करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या योजनेचे भूमिपूजन केल्याने तालुक्यात नाराजी पसरली आहे.शिष्टमंडळात शिवसेनेचे तालुका प्रमुख अंबादास जाधव, बाजार समितीचे संचालक शितलकुमार अहिरे, डॉ दिनेश बागूल, संजय रौंदळ, किशोर पवार, डॉ. पंकज मेणे आदी सहभागी झाले होते.पुनंद धरणातून सटाणा शहरास पाणी देण्यास शिवसेनेचा व तालुकावासीयांचा विरोध नाही. मात्र पाईपलाइनने पाणी नेण्याऐवजी सुळे डाव्या कालव्याद्वारे नेण्यात यावे पाईपलाइनने पाणी नेल्यास या भागातील बागायती शेती उद्धवस्त होईल. शेतकºयांच्या भावनांचा आदर करीत ह्या योजनेसंदर्भात फेरविचार करावा.- अंबादास जाधव,शिवसेना, तालुकाप्रमुख कळवण.