शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

बससेवा मनपाने ताब्यात घेण्यास शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2018 01:15 IST

  नाशिक : महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घेऊ नये, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक लवकरच राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेतील सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने शहर बससेवा ताब्यात घेण्याची मानसिकता ...

ठळक मुद्देसेना घेणार परिवहनमंत्र्यांची भेटप्रशासनाने शहर बससेवा ताब्यात घेण्याची मानसिकता

 

 

नाशिक : महापालिकेने तोट्यात चालणारी शहर बससेवा ताब्यात घेऊ नये, या भूमिकेवर शिवसेना ठाम असून याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवक लवकरच राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची भेट घेणार असल्याची माहिती शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.महापालिकेतील सत्ताधारी भाजपासह प्रशासनाने शहर बससेवा ताब्यात घेण्याची मानसिकता तयार केली असून, येत्या महासभेत त्याबाबतचा प्रस्ताव सादर होण्याची शक्यता आहे. शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, यासाठी महापालिकेने सर्वेक्षणासाठी क्रिसील या संस्थेची नियुक्ती केली होती. बोरस्ते यांनी क्रिसीलच्याही अहवालाबाबत शंका उपस्थित करत वस्तुस्थिती निराळी असल्याचे सांगितले. शहर बससेवा चालविणे हे महापालिकेचे काम नसून एसटी महामंडळानेच उत्पन्नाचे स्त्रोत शोधून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी लवकरच विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांची भेट घेऊन त्यांच्याकडून शहर बससेवेची सद्यस्थिती समजून घेतली जाणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री व शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांचीही भेट घेऊन त्यांच्यापुढे वस्तुस्थिती मांडली जाणार असल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. यावेळी शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक सत्यभामा गाडेकर, संतोष गायकवाड उपस्थित होते. वाहतूक धोरणावर आज कार्यशाळा राज्य शासनाच्या नगरविकास मंत्रालयाने राज्य नागरी वाहतूक धोरण प्रस्तावित केले असून, त्यात शहरातील सार्वजनिक वाहतुकीची जबाबदारी महापालिकेचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. या धोरणावर चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि.२) सकाळी १०.३० वाजता मनपा आयुक्तांच्या दालनाशेजारील सभागृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेचे संचालन राज्य शासनाने नियुक्त केलेल्या आयटीडीपी या संस्थेमार्फत केले जाणार आहे. दरम्यान, या कार्यशाळेत शिवसेना सहभागी होणार नसल्याचे अजय बोरस्ते यांनी सांगितले. ‘झेप’मार्फत सर्वेक्षणशहर बससेवा महापालिकेने ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचे सर्वेक्षण झेप संस्थेच्या वतीने हंप्राठा महाविद्यालयातील पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमार्फत सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती झेपचे अध्यक्ष व माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी दिली आहे.या सर्वेक्षणाचे निष्कर्ष पाहून पुढील दिशा निश्चित केली जाणार असल्याचेही बग्गा यांनी म्हटले आहे.