शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे आजी-माजी जिल्हाप्रमुख आमने-सामने

By admin | Updated: June 5, 2017 01:04 IST

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अखेर निवडणुकीत उडी घेतल्याने माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे आमने-सामने आले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अखेर निवडणुकीत उडी घेतल्याने माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे यंदा व्यापारी बँकेची निवडणूक चांगलीच चुरशीची होईल, असे चित्र दिसू लागले असून, शिवसेनेतील राजकारणालादेखील कलाटणी मिळणार आहे.नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे. सत्तारूढ सहकार पँनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे करत आहे. गेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी श्री व्यापारीचे सहा संचालक निवडून आले होते. त्यापैकी संचालक अशोक सातभाई यांनी श्री व्यापारी पॅनलला रामराम ठोकत सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला आहे.सहकार पॅनलचे बहुतांश उमेदवार निश्चित असून, गेल्या ८-१0 दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात करत सभासदांच्या व विविध समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तर श्री व्यापारी पॅनलच्या संचालकांनी पॅनलची मोट बांधण्यासाठी काम केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतात की नाही तसेच कोणत्या पॅनलच्या पाठीशी उभे राहतात, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेला उधाण आले होते. मात्र रविवारी दुपारी करंजकर यांनी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व स्वीकारत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनाही सहकार पॅनलच्या सोबत होती. मात्र यंदा जिल्हाप्रमुख करंजकर यांनी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व स्वीकारल्याने सहकार पॅनलचे नेते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड हे समोरासमोर उभे ठाकले आहेत. यामुळे व्यापारी बँक निवडणूक रंगणार आहेच. शिवाय शिवसेनेतील राजकारणदेखील ढवळून निघणार आहे.दुर्गा उद्यान समोरील श्री व्यापारी पॅनलच्या कार्यालयात विजय करंजकर, राजू लवटे, राजू टर्ले, हेमंत गायकवाड, सतीश मंडलेचा यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून मंगळवारी सकाळी भगूरच्या श्री रेणुका माता मंदिरात श्री पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. बँकेतील एकाधिकारशाही बंद करण्यासाठी श्री व्यापारी पॅनल निवडणूक लढवित असल्याचे करंजकर यांनी यावेळी सांगितले. बैठकीला नगगरसेवक रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, अ‍ॅड. सुनील बोराडे, अ‍ॅड. मुकुंद आढाव, चंद्रकांत विसपुते, शंकरशेठ धनवटे, विलास पेखळे, गंगाधर उगले, शांताराम घंटे, प्रकाश गोहाड, शिरीष लवटे, कन्नू ताजणे, योगेश नागरे, विक्रम खरोटे, सुदाम ताजनपुरे, श्याम गोहाड, संदीप कर्नावट, अजित गायकवाड, रमेश पाळदे आदि उपस्थित होते.