शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेचे ‘ढोल बजाओ’

By admin | Updated: July 10, 2017 22:54 IST

याद्या मागितल्या : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती फसवी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा बॅँकेसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमुक्ती फसवी असून, जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. त्याचाच भाग म्हणून राज्यात सर्व बॅँकांसमोर शिवसेनेच्या वतीने ढोल बजाओ आंदोलन करण्यात येत असल्याचे प्रतिपादन संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी केले.द्वारका येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या आवारात सोमवारी (दि. १०) शिवसेनेच्या वतीने ‘ढोल बजाओ’ आंदोलन करून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्यांची मागणी करण्यात आली. तसेच ढोल वाजवून यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. ‘ढोल बजाओ’ आंदोलनात संपर्कप्रमुख सुहास सामंत यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची खरी माहिती शिवसेनेला हवी आहे. सरकारने केलेली कर्जमाफीची आकडेवारी फसवी आहे. जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी भूमिका शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचे सांगत जोपर्यंत शेतकऱ्यांना संपूर्ण सरसकट कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचाच भाग म्हणून जिल्हा बँकांसह सर्वच बँकांकडून कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांची यादी मागण्यासाठी जाब विचारणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक विलास बोरस्ते यांनी कर्जमाफीचा शासन निर्णय अद्याप प्राप्त नसून, कर्जमुक्त शेतकऱ्यांच्या याद्या बनविण्याचे काम सुरू आहे. याद्या तयार झाल्यानंतर त्या देण्यात येतील, असे सांगितले. यावेळी जिल्हा बॅँक अध्यक्षांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. आमदार राजाभाऊ वाजे, आमदार योगेश घोलप, जिल्हाप्रमुख सुहास कांदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, मनपा गटनेते विलास शिंदे, चंदक्रांत लवटे, सुधाकर बडगुजर, जगन्नाथ आगळे, डी. जी. सूर्यवंशी, शिवाजी भोर, नितीन चिडे, सुदाम ढेमसे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.