शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’साठी शिवसेनेचे अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:39 IST

महापालिका आयुक्तांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्याकरिता येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत मुदत दिल्यानंतर शिवसेनेने भाजपाच्या नादाला न लागता मंगळवारी (दि.२६) आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. शिवसेनेने दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज दाखल केले असून, महासभेच्या पूर्वी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. आता शिवसेनेने अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतल्यानंतर भाजपाची प्रतीक्षा आहे.

नाशिक : महापालिका आयुक्तांनी स्वीकृत सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करण्याकरिता येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत मुदत दिल्यानंतर शिवसेनेने भाजपाच्या नादाला न लागता मंगळवारी (दि.२६) आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले. शिवसेनेने दोन जागांसाठी चार जणांचे अर्ज दाखल केले असून, महासभेच्या पूर्वी दोन नावांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी दिली. आता शिवसेनेने अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतल्यानंतर भाजपाची प्रतीक्षा आहे.  गेल्या सहा महिन्यांपासून स्वीकृत सदस्यांची निवड रखडली आहे. तौलनिक संख्याबळानुसार भाजपाचे तीन, तर शिवसेनेचे दोन सदस्य स्वीकृत म्हणून नियुक्त होऊ शकतात. मात्र, भाजपात तीन जागांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने एकमत होण्यास विलंब लागत आहे. त्यातच पालकमंत्र्यांसह आमदारांनीही त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नावांचा आग्रह धरल्याने मोठी चुरस निर्माण झालेली आहे. शिवसेनेने मात्र चार नावांची घोषणा करत आघाडी घेतली. केवळ भाजपाच्या विनंतीवरून सेनेने नावे आयुक्तांकडे सुपूर्द केली नव्हती. महापालिका अधिनियमानुसार, सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर महिनाभरात स्वीकृत सदस्यांची निवड होणे आवश्यक आहे. परंतु, सहा महिने लोटले तरी स्वीकृतला मुहूर्त लागत नसल्याने प्रशासनही पेचात सापडले आहे. यापूर्वी दोनदा मुदत देऊनही सेना-भाजपाने स्वीकृतसंदर्भात नावे न दिल्याने आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सोमवारी (दि.२५) सेना-भाजपा पदाधिकाºयांची बैठक बोलाविली होती. यावेळी, आयुक्तांनी येत्या शुक्रवार (दि.२९) पर्यंत नावे देण्याची सूचना केली. यापुढे मुदतवाढ देता येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपा पदाधिकाºयांनी मात्र, दिवाळीपर्यंत मुदत वाढवून देण्याचा आग्रह धरला परंतु, आयुक्तांनी त्यास नकार दर्शविला. दरम्यान, मंगळवारी शिवसेनेने भाजपावर निर्भर न राहता आपल्या उमेदवारांचे अर्ज अतिरिक्त आयुक्त रमेश पवार व नगरसचिव ए. पी. वाघ यांच्याकडे सादर केले. शिवसेनेने सुनील गोडसे, काशीनाथ तथा राजेंद्र वाकसरे, अलका गायकवाड आणि अ‍ॅड. श्यामला दीक्षित यांचे अर्ज दाखल केले. यातील दोहोंची स्वीकृत नगरसेवकपदासाठी लॉटरी लागणार आहे.