शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीसाठी शिवसेनेचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:10 IST

दसºयापर्यंत मुदत : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा नाशिक : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी, राज्यात एकही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा शिवसेनेने आपल्याच सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कर्जमाफीसाठी दसºयापर्यंत अल्टिमेटम दिला.

दसºयापर्यंत मुदत : अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

नाशिक : शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून तीन महिने उलटले तरी, राज्यात एकही शेतकरी कर्जमुक्त झालेला नाही. सरकार फक्त आकडेवारीचा खेळ करीत असल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा शिवसेनेने आपल्याच सरकारच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून कर्जमाफीसाठी दसºयापर्यंत अल्टिमेटम दिला.शिवसेनेच्या शालिमार चौकातील मध्यवर्ती कार्यालयापासून दुपारी साडेबारा वाजता मोर्चा काढण्यात आला. ‘कर्जमाफी झालीच पाहिजे, भीक नको हक्क हवा, कर्जमाफीची माहिती मिळायलाच पाहिजे, बळीराजा हा देशाचा सहारा, त्याला वाचवू हाच शिवसेनेचा नारा’ अशा घोषणा लिहिलेले फलक हातात घेऊन शिवसैनिक मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाच्या प्रारंभी शेतकºयाचे प्रतीक म्हणून तीन बैलगाड्याही ठेवण्यात आल्या होत्या व त्यावर शेतकºयांना स्वार करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयापासून निघालेला मोर्चा शिवाजीरोडने थेट मध्यवर्ती बसस्थानक चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावरधडकला. यावेळी पोलिसांनीचोख बंदोबस्त ठेवला होता. शिष्टमंडळाने जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत हा मोर्चा आटोपला. या निवेदनात म्हटले आहे की, कर्जबाजारीपणा, नापिकीमुळे महाराष्टÑात शेतकºयांच्या दररोज आत्महत्या होत असून, ते टाळण्यासाठी शेतकºयांना कर्जमुक्ती देण्याची मागणी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांत अगोदर केली. त्यासाठी शेतकºयांचे मोर्चेही काढण्यात आले.यावेळी आमदार योगेश घोलप, राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुहास कांदे, भाऊलाल तांबडे, अजय बोरस्ते, विलास शिंदे, श्यामला दीक्षित, सत्यभामा गाडेकर, डी. जी. सूर्यवंशी, राजू लवटे, प्रवीण तिदमे, धनराज महाले यांच्यासह शेकडो शिवसैनिक सहभागी झाले होते.शेतकºयांमध्ये फसवणुकीची भावनाशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्यातील शेतकºयांना कर्जमाफीची घोषणा केली. परंतु तीन महिने उलटूनही एकाही शेतकºयाची कर्जमाफी झाली नाही. सरकार केवळ आकड्यांचा खेळ करीत असून, तारखांवर तारखा देत आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये फसवणुकीची भावना निर्माण होऊन असंतोष निर्माण झाला आहे. कर्जमाफी अर्जाचे क्लिष्ट नियम, निकषांमुळेही अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. शासनाने शेतकºयांच्या भावनांचा विचार करून दसºयापर्यंत सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन छेडेल व त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.