शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेने तडकाफडकी बदलले संपर्कप्रमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 01:46 IST

लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.

नाशिक : लोकसभा निवडणुका घोषित झाल्या असतानाच शिवसेनेने तडकाफडकी शहरातील विधानसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख बदलले असून, रविवारी (दि. १०) त्यांनी तातडीने नाशिकमध्ये येऊन बैठकादेखील घेतल्या आहेत.लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर साधारणत: पदे बदलली जात नाहीत. संघटनावर त्याचा परिणाम होतो, असे सांगितले जाते. त्यामुळे अनेक पक्षांत बदलण्याचे काम अगोदर केले जाते किंवा निवडणूक निकालाच्या पश्चात केले जाते. परंतु सेनेने मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावरच बदल केले आहेत.पूर्वी नाशिक पूर्व विधानसभेची जबाबदारी मिलिंद घनकुटकर, पश्चिम विधानसभा मतदारसंघाची नीलेश चव्हाण यांच्याकडे, तर मध्य नाशिकची जबाबदारी हेमंत रासम यांच्याकडे होती. त्याऐवजी आता पूर्व मतदारसंघाकडे गिरीश विचारे, मध्य नाशिकमध्ये ललित शाईवाले तसेच पश्चिमची जबाबदारी प्रकाश वाणी यांच्याकडे देण्यात आली आहे. जुन्या संपर्क प्रमुखांच्या काळात मध्यमध्ये अनेक संघटनात्मक रचनांची कामे अपूर्ण होती, तर पश्चिममध्ये संपर्कप्रमुखच सत्तेची स्वप्ने बघू लागली होती असे समजते. त्या पार्श्वभूमीवर पक्षाने तातडीने बदल केले आहेत.शिवसेनेने हे बदल तातडीने झाले असले तरी भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांना तूर्तास तरी अभय मिळाल्याचे दिसत आहेत. आमदार आणि शहराध्यक्ष असे दुहेरीपदे भुषविणाऱ्यांना शहराध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याचा निर्णय भाजपाने घेतला होता. संघटना आणि सत्तेची पदे एकाच व्यक्तीकडे असेल तर ती व्यक्ती संघटनात्मक कामांना न्याय देऊ शकणार नाही, अशी बाजू पक्षाच्या वतीने मांडली जात होती. मात्र वेळेत हा बदल अमलात आलानाही. आता लोकसभा निकालानंतरच बदल होऊ शकतो, असे सूत्रांनी सांगितले, तर कॉँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेरदेखील गच्छंतीतून तूर्तास बचावले आहेत. आहेर यांना हटविण्यासाठी तयारी झाली होती.पक्षाचे प्रदेश सरचिटणीस पृथ्वीराज साठे यांनी सर्वांचे  म्हणणे ऐकले होते त्यानंतर महापालिकेतील गटनेता शाहू खैरे यांना बदलल्यानंतर आता  आहेर यांचा क्रमांक लागणार  अशी चर्चा असतानाचलोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने तूर्तास ते बचावल्याचे सांगितले जाते.पदांच्या खिरापतींचे वाटपएकीकडे शिवसेनेकडून संपर्कप्रमुखांत बदल केले जात असताना दुसरीकडे अनेक पक्षांकडून विशेषत: भाजपाकडून पदांचे खिरापतीसारखे वाटप सुरू झाले आहेत. गेली साडेचार वर्षे काहीच सत्तापद किंवा समित्या न मिळालेल्यांना संघटनात्मकपदे देण्याचा सपाटा सुरू झाला आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकShiv Senaशिवसेना