शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

महाराजांच्या जन्मोत्सवासाठी उसळला शिवसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 01:19 IST

नाशिक : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सोमवारी (दि.१९) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी पारंपरिक वाद्यांच्या तालावर विविध लोककलांच्या सादरीकरणासोबत लेजीम पथक आणि मिरवणुकीत शिवभक्तांनीही ठेका धरला.

ठळक मुद्देपारंपरिक वाद्यांच्या तालावर विविध लोककलांच्या सादरीकरण. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी शिववंदना व जिजाऊ वंदना करण्यात आली

हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिववंदनेसाठी उसळलेली शिवप्रेमींची अलोट गर्दी.

 

नाशिक : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सोमवारी (दि.१९) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी पारंपरिक वाद्यांच्या तालावर विविध लोककलांच्या सादरीकरणासोबत लेजीम पथक आणि मिरवणुकीत शिवभक्तांनीही ठेका धरला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ््यानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी शिववंदना व जिजाऊ वंदना करण्यात आली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आयोजकांना एक लाख नागरिकांच्या सहभागासह शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे ग्रामीण अध्यक्ष आमदार अपूर्व हिरे, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे शहर अध्यक्ष सुनील बागुल, आमदार सीमा हिरे, छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर गगणभेदी तुताºयांच्या निनादांसह ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा संत तुकाराम महाराज यांच्यासोबतचा संवाद दाखवणारा चित्ररथ, त्यानंतर राजमाता जिजाऊ बाल शिवाजींना स्वराज्य स्थापनेचे धडे देतानाचे दर्शन घडविणाºया चित्ररथासोबतच संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाºया चित्ररथांचाही मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता.

पालकमंंत्र्यांनीही धरला ठेकाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार बाळासाहेब, महापौर रंजना भानसी आदी पदाधिकाºयांनी छत्रपतींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे पालकमंत्र्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत लेजीम खेळण्याचा आनंद घेतला.

महिलांसह आबालवृद्धांचा सहभागशिवजन्मोत्सव पालखी सोहळ्यात बहुजन समाजाच्या आबालवृद्धांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती, महिलांनी भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग घेतला, तर लहान बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.