शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी शिवराजसिंह चौहान : त्र्यंबकराजाचे घेतले सहकुटुंब दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 00:50 IST

नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून, मोदींपेक्षा शेतकऱ्यांचे हित बघणारा पंतप्रधान झाला नाही, असे सांगत जे मैदानात मोदींशी मुकाबला करू शकत नाही, ते राजकारण करत असून, शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी असल्याचे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.

नाशिक : केंद्र सरकारचे नवीन कृषी धोरण शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असून, मोदींपेक्षा शेतकऱ्यांचे हित बघणारा पंतप्रधान झाला नाही, असे सांगत जे मैदानात मोदींशी मुकाबला करू शकत नाही, ते राजकारण करत असून, शेतकऱ्यांना चर्चेची दारे उघडी असल्याचे मत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी व्यक्त केले.सालाबादाप्रमाणे चौहान शनिवारी त्र्यंबकेश्वर येथे सहकुटुंब दर्शनार्थ आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी चौैहान म्हणाले, कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्ष भयावह गेले. आपला देश, प्रदेश कोरोनामुळे प्रभावित झाला होता. आजपासून कोरोनाचा सुरू असलेला ड्राय रन यशस्वी होवो, तसेच जीएसटी वसुली व्यवस्थित होऊन अर्थव्यवस्था सुरळीत व्हावी, अशी प्रार्थनाही त्यांनी यावेळी केली. मध्य प्रदेशमध्ये कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात, मृत्युदरही नियंत्रणात असल्याचे सांगत, लव जिहादच्या कायद्याचे कठोर पालन केले जाणार असून, दोषीस कठोर शासन केले जाणार असल्याचे चौहान यांनी सांगितले.त्र्यंबकराजाला अभिषेकगर्भगृहात जाण्यासाठी बंदी असल्याने चौहान यांनी मंदिरातच अभिषेक केला. पूजेचे पौराहित्य श्रीनिवास तथा वामनराव गायधनी यांनी केले. त्यांना प्रशांत गायधनी, सुयोग वाडेकर, कृपेश तथा नाना भट आदींनी सहकार्य केले. त्यानंतर, त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या कोठी हाॅलमध्ये देवस्थानच्या वतीने चौहान, त्यांच्या पत्नी, दोन मुले यांचा त्र्यंबकेश्वराची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त संतोष कदम, प्रशांत गायधनी, तृप्ती धारणे, पंकज भुतडा, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड.श्रीकांत गायधनी, विरिज मुळे, तृप्ती धारणे, पंकज धारणे आदी उपस्थित होते.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान