शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

निफाड येथे शिवजन्मोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 00:24 IST

निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणूक पिंपळगाव रोड, एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली.

ठळक मुद्देजन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणाततरुणांनी आपल्या दुचाकीला मोठमोठे भगवे झेंडे लावले होते.

निफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणूक पिंपळगाव रोड, एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या तीर्थाने अभिषेक घालण्यात आला. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत अग्रभागी भगवे फेटे बांधलेल्या मुली, तरु णी होत्या. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. ही रॅली आंबेडकर चौक येथे आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी चौक येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रॅलीतील शिवप्रेमींना पाणी वाटप करण्यात आले.रॅलीने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता. रॅली मामलेदार चौक, माणकेश्वर चौक, शिंपी गल्ली पेठ गल्ली मार्गे शिवाजी चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.सायंकाळी शिवाजी चौकातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या रथात मिरवणूक काढण्यात आली अग्रभागी वाद्यवृंद होता या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते निफाड शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येनेतरुणांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.निफाड येथे शिवजन्मोत्सवनिफाड : येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.सकाळी शांतीनगर त्रिफुलीपासून कावड मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत सजवलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रालीमध्ये शिवाजी महाराज यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. मिरवणूक पिंपळगाव रोड, एसटी स्टँड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे आली. त्यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे कावडीतून आणलेल्या गोदावरीच्या तीर्थाने अभिषेक घालण्यात आला. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला व रॅलीला प्रारंभ करण्यात आला. या रॅलीत अग्रभागी भगवे फेटे बांधलेल्या मुली, तरु णी होत्या. महिलांनी भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. ही रॅली आंबेडकर चौक येथे आल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. संभाजी चौक येथे संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने रॅलीतील शिवप्रेमींना पाणी वाटप करण्यात आले.रॅलीने निफाडकरांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ जय शिवराय या जयघोषांनी परिसर दणाणून गेला होता. रॅली मामलेदार चौक, माणकेश्वर चौक, शिंपी गल्ली पेठ गल्ली मार्गे शिवाजी चौकात आल्यानंतर रॅलीचा समारोप करण्यात आला.सायंकाळी शिवाजी चौकातून शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची सजवलेल्या रथात मिरवणूक काढण्यात आली अग्रभागी वाद्यवृंद होता या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरु ण सहभागी झाले होते निफाड शहरातील प्रमुख मार्गावरून ही मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने तरुणांनी भगवे झेंडे हातात घेतले होते.शांतीनगर त्रिफुली, पिंपळगाव रोड, शिवाजी चौक, विंचूर रोड परिसरात भगवे झेंडे लावण्यात आल्याने हा सर्व परिसर भगवामय झाला होता. शहरात तरुणांनी आपल्या दुचाकीला मोठमोठे भगवे झेंडे लावले होते. त्यामुळे शहरातील शिवजयंती सोहळ्याला अनोखी किनार लाभली होती.