पिंपळगाव बसवंत परिसरातील मुखेड येथे शिवसैनिकांच्या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते .याप्रसंगी सरपंच अमोल जाधव, उपसरपंच वृषाली पवार, आदीसह संपत जाधव, देवदत्त शेळके, भिका कदम, ज्ञानेश्वर ढगे, गेनू शेळके, रमेश शेळके, योगेश वाघ, निखिल जाधव, विजय पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या शिवसंपर्क पंधरवड्यात आरोग्य शिबिर, वृक्ष दान व वृक्षारोपण शिबिर, तसेच कोरोनायोद्धा म्हणून काम करणाऱ्या आशासेविका आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सत्कार या शिव संपर्क अभियानात शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य लीलाबाई पाटील, प्रवीण जाधव, सागर शिंगाडे, शरद गायकवाड, अनिता गांगुर्डे, जयश्री नेहरे, छाया जाधव, महेश शेळके, चेतन शेळके, भाऊसाहेब नेहरे, बाळासाहेब जाधव, विक्रांत जाधव, ओंकार जाधव, भाऊसाहेब शेळके आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुखेड येथे शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST