शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शिवसेनेचा नरेंद्र मोदी यांना अपशकून !; दहा दिवसात भुमिकेत बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:38 IST

नाशिक : गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणा-या शिवसेनेच्या भुमिकेत दहा दिवसातच बदल झाला असून, शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिवसेना आता नरेंद्र मोदी यांना अपशकून करण्यास सरसावल्याचे मानले ...

नाशिक : गुजरात निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहणार असल्याचे सांगणा-या शिवसेनेच्या भुमिकेत दहा दिवसातच बदल झाला असून, शिवसेना पक्ष अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी गुजरात निवडणुकीत ४० जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिवसेना आता नरेंद्र मोदी यांना अपशकून करण्यास सरसावल्याचे मानले जात आहे.नाशिकच्या दौºयावर आलेले संपर्क नेते तथा शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधतांना गुजरात निवडणुकीपासून शिवसेना दूर राहणार असल्याचे सांगितले होते. गुजरातची निवडणूक चांगलीच गाजत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपिच असलेल्या गुजरातची राजकीय परिस्थिती पाहता मोदी यांना अपशकून नको म्हणून शिवसेना निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले होते. हे सांगत असताना राऊत यांनी कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांची स्तुतीही केली होती. गुजरातच्या निवडणुकीबाबत शिवसेनेने घेतलेल्या या भुमिकेचे भाजपाने स्वागत केले तर विरोधी पक्षांनी आश्चर्य व्यक्त केले होते. शिवसेनेने सातत्याने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात भुमिका घेत त्यांच्यावर टिका केलेली असताना अचानक गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने त्यांना मोदी यांचा पुळका आल्याबद्दल शिवसेनेवर टिकाही करण्यात आली होती. परंतु दहा दिवस उलटत नाही तोच शिवसेनेने गुजरात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय जाहीर केल्याने शिवसेनेच्या मनात नरेंद्र मोदी यांच्याविषयी असलेला मान अचानक कमी झाला काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सेनेची गुजरात निवडणुकीत उडी म्हणजे हिंदु मतांचे विभाजन मानले जात असून, त्यामुळे मोदी यांना अपशकून करण्यासाठीच सेना निवडणूक लढविणार असल्याचे मानले जात आहे. सेनेच्या या भुमीकेने भाजपात चिंता व्यक्त होणे साहजिकच असून, विरोधी पक्षांनी मात्र सेनेच्या या भुमिकेचे स्वागत केले आहे.