सटाणा : तालुक्यातील पिंपळदरच्या सरपंचपदी शिवसेनेचे संदीप पवार काल झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले.गेल्या पंधरा दिवसांपूर्वी राजेंद्र पवार यांच्यावर सहा सदस्यांनी आपल्याला विश्वासात घेत नाही म्हणून अविश्वास आणून त्यांना सरपंचपदावरून पायउतार केले होते. रिक्त पदाच्या निवडीसाठी काल दुपारी १ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी एस. आर. गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची विशेष सभा बोलावण्यात आली होती.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत संदीप पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी गोसावी यांनी जाहीर केले. त्यांना सूचक म्हणून वैशाली पवार सूचक, तर शरद पवार अनुमोदक होते.निवडीनंतर शिवसेनेच्या वतीने गुलाल उधळून जल्लोष केला. यावेळी नविनर्वाचित सरपंच संदीप पवार यांचा शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख लालचंद सोनवणे ,अरविंद सोनवणे ,तालुका प्रमुख सुभाष नंदन ,शहर प्रमुख शरद शेवाळ यांनी सत्कार केला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य शरद पवार, वैशाली पवार, सोनाली पवार, मीराबाई पवार, मंजाबाई बोरसे यांच्यासह भारत पवार, प्रमोद पवार, संदीप पवार, सुनील बागुल, गटलू बोरसे, प्रभाकर पवार, भिकन बागुल, पप्पू मांडवडे, लहू पिंपळसे, एकनाथ पवार, रामदास गवळी, सुधाकर जगताप, भगवान पवार, एस. आर. सूर्यवंशी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
पिंपळदर सरपंचपदी शिवसेनेचे संदीप पवार बिनविरोध
By admin | Updated: August 12, 2016 22:24 IST