शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

शिवसेनेचे हेमंत गोडसे यांचा विजय ;  युतीची बाजी, आघाडीला धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 02:25 IST

लोकसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागावर वचर्स्व निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचा वरचष्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाला तर दुसरीकडे राष्टवादीचे हेविवेट नेता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची वाटचाल अडखळली नव्हे महाआघाडीला मोठा धक्का बसला.

नाशिक : लोकसभा निवडणुकीत शहरासह ग्रामीण भागावर वचर्स्व निर्माण करणाऱ्या शिवसेना-भाजपा युतीचा वरचष्मा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झाला तर दुसरीकडे राष्टवादीचे हेविवेट नेता छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महाआघाडीची वाटचाल अडखळली नव्हे महाआघाडीला मोठा धक्का बसला. युतीचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांनी अंतिम निकालाअंती २,९२,२०४ मताधिक्क्याने विजयी आघाडी घेत समीर भुजबळ यांचा दारूण पराभव केला. भाजपाचे बंडखोर उमेदवार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे तिसºया तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन चंद्रकांत पवार हे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले.विधानसभा निवडणुकीची नांदी ठरणाºया लोकसभा निवडणुकीचा निकाल गुरुवारी (दि.२३) निकाल लागला असून, यात युतीने पुन्हा एकदा दणदणीत विजय मिळवला आहे. लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राज्यात सत्ता असतानही सेना-भाजपा धुसफूस सुरू होती. मात्र ऐन लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेना-भाजपा आणि शिवसेनेची युती झाली, त्याचा फायदा भाजपा-सेनेला झाला. मात्र महाआघाडीला धक्का सहन करावा लागला.या निवडणुकीत हेमंत गोडसे यांना ५,६३,५९९ मते मिळाली, तर राष्टÑवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांना २,७१,३९५ मते मिळाली. म्हणजेच गोडसे यांना २,९२,२०४ एवढे मताधिक्य मिळाले. भाजपाचे बंडखोर माजी आमदार अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांना १,३४,५२७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांना १,०९,९८१ मते मिळाली.लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सकाळी ८ वाजता अंबडच्या सेंट्रल वेअर हाउस येथे निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आली. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय १४ अशा प्रकारे नाशिक मतदारसंघासाठी ८४ टेबल लावण्यात आले होते. तत्पूर्वी सकाळी ६ वाजेपासूनच मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मतमोजणी केंद्रात आगमन झाल्याने कोणत्या टेबलावर कोण अधिकारी, कर्मचारी असेल ते संगणकीयप्रणालीने जाहीर करण्यात आले व प्रत्येकाला आपल्या टेबलावर आसनस्थ करण्यात आले. ८ वाजेच्या ठोक्याला उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसमक्ष निवडणूक निर्णय अधिकाºयांनी मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रॉँग रूमचे सील काढण्यात आले. त्यानंतर पोस्टल मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात आली. यंदा पोस्टल मतपत्रिकांना बारकोड असल्यामुळे व प्रत्येक मतपत्रिकेचे स्कॅनिंग करण्याचे आयोगाचे आदेश असल्याने अत्यंत काळजीपूर्वक या मतिपत्रका मोजण्यास सुरु वात करण्यात आली. परंतु निवडणूक आयोगाच्या सर्व्हरमध्ये बिघाड झल्यामुळे मोजणी होऊ शकली नाही. बराच काळ प्रतीक्षा केल्यानंतर त्यामुळे आयोगाच्या आदेशाने ईव्हीमची मतमोजणी सुरू करण्यात आली.या निकालाचा ऐतिहासिक संदर्भनाशिकमध्ये एकदा निवडून गेलेला खासदार पुन्हा निवडून येत नाहीत असा १९७१ सालापासूनचा इतिहास आहे. त्यामुळे नाशिकचा खासदार नो रिपीट असा प्रचाराचा मुद्दा देखील असतो. परंतु यंदा मात्र हेमंत गोडसे यांनी ही परंपरा खंडित केली आणि तब्बल ४८ वर्षांनी खासदार पुन्हा निवडून येण्याचा अनोखा विक्रम नोंदविला. यापूर्वी १९६७ साली भारतीय राष्टÑीय काँग्रेसचे भानुदास कवडे हे विजयी झाल्यानंतर पुन्हायापूर्वी १९७१ मध्ये ते सलग निवडून आले होते. त्यांच्या पूर्वी १९५१ मध्ये कॉँग्रेस पक्षाचेच गो. ह. देशपांडे हे निवडून आल्यानंतर पुढील म्हणजेच १९५७ मध्ये त्यांचा पराभव झाला होता. परंतु सलग निवडून येणारे खासदार म्हणून कवडे एकमेव होते. त्यानंतर हा विक्रम कोणी मोडला नव्हता. परंतु नाशिकचा खासदार नो रिपीट हा सातत्याने चालणारा प्रचार मोडीत काढून हेमंत गोडसे यांनी ऐतिहासिक विजय मिळवला.समीर भुजबळ यांच्या पराभवाची पाच कारणेकेंद्रातील मोदी लाट पुन्हा एकदा दिसून आल्याने त्यासमोर टिकाव लागला नाही.छगन भुजबळ यांच्याऐवजी उमेदवारी दिल्याने असलेली पक्षांतर्गत नाराजी.केवळ राष्टवादीवरच मदार, मित्र कॉँग्रेस पक्षाकडून अपेक्षित भरीव साथ नाही.वंचित आघाडीने उमेदवार उभे केल्याने मतांचे झालेले विभाजन.पूर्वाश्रमीचे कॉँग्रेस पण आता भाजपा बंडखोर असलेल्या कोकाटे यांच्या उमेदवारीचा फटका.जनसेवेचा वसा पुढे सुरूच ठेवणारनाशिककरांनी दिलेला कौल आम्ही खुल्या मनाने स्वीकारतो. या निकालामुळे जनसेवेच्या कामावर कुठलाही परिणाम होणार नाही. हा जनसेवेचा वसा यापुढेही अविरत सुरूच राहील. राष्टÑवादी कॉँग्रेसच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आम्ही नेहमीच लढा दिला आहे. यापुढेही तो अविरतपणे सुरू राहील. गेली पाच वर्षे विकासाची घोडदौड पूर्णपणे थांबली होती. त्यामुळे नाशिकला पुन्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी निवडणुकीला सामोरे गेलो होतो. आता पराभवाने खचून न जाता विधानसभेसाठी सज्ज होणार आहे.- समीर भुजबळ, पराभूत उमेदवार, राष्टवादी कॉँग्रेसनाव               पक्ष                 मतेहेमंत गोडसे शिवसेना ५,६३,५९९समीर भुजबळ राष्टवादी २,७१,३९५माणिकराव कोकाटे अपक्ष १,३४,५२७पवन पवार वंचित आघाडी १,०९,९८१वैभव आहिरे बसपा ५,७१९सोनिया जावळे आयटीपी ६,९५२विनोद शिरसाठ हिजपा १,३६२ंशिवनाथ कासार बमुपा ८६६संजय घोडके बीआरसी ८९९शरद आहेर अपक्ष १,३८७प्रकाश कनोजे अपक्ष ९२२सिंंधूबाई केदार अपक्ष १,३३६देविदास सरकटे अपक्ष ४,२७४धनंजय भावसार अपक्ष १,८८५प्रियंका शिरोळे अपक्ष २,२०६विलास देसले अपक्ष ३,८२६शरद धनराव अपक्ष ८३५सुधीर देशमुख अपक्ष १,८८१नोटा ६,९८०

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnashik-pcनाशिक