शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

प्रसुतिप्रकरणी दोषींची सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 15:44 IST

मायको रुग्णालय : शिवसेनेकडून आयुक्तांना निवेदन

ठळक मुद्देमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन निवेदन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे २४ तास कार्यरत असणे आवश्यक

नाशिक : पंचवटीतील मायको रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याप्रकरणी दोषींची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, पंचवटीतील मायको रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यासह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गरीब महिलेची प्रसूती रिक्षातच झाली. सदर घटना अतिशय गंभीर आहे. वास्तविक रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे २४ तास कार्यरत असणे आवश्यक आहे. परंतु रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता व अत्यावश्यक सेवा असताना रजेवर निघून गेले. पंचवटीतील पेठरोड भागात मोठ्या प्रमाणावर स्लम वसाहत आहे. मायको रुग्णालय तेथील गरीब लोकांना सोयीचे ठरते. मायको रुग्णालयात घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुवर्णा मटाले, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे, संगीता जाधव, हर्षदा गायकर तसेच सीमा निगळ आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.औषधे जातात कुठे?शिवसेनेने निवेदनात औषध खरेदीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निवेदनात म्हटले आहे, वैद्यकीय विभागासाठी कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी तसेच साहित्य खरेदी होत असते. परंतु, ही सारी औषधे व साहित्य जातात कुठे, याचा उलगडा होत नाही. आरोग्य व वैद्यकीय सेवा २४ तास असताना वैद्यकीय अधिकारी नावालाच दवाखान्यात येतात आणि रुग्णांना स्वत:च्या खासगी दवाखान्यात घेऊन जातात. याचीही चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाpregnant womanगर्भवती महिला