शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना - भाजपाचा उमेदवार ठरविताना कसरत

By admin | Updated: January 29, 2017 00:41 IST

जेलरोड प्रभाग : इच्छुकांची गर्दी; राजकीय गणित बदलले; अद्याप चित्र स्पष्ट नाही

मनोज मालपाणी :  नाशिकरोडजेलरोड प्रभाग १८ मध्ये इच्छुकांची झालेल्या गर्दीमुळे शिवसेना-भाजपाला उमेदवारी ठरवितांना मोठी कसरत करावी लागणार आहे. तर कॉँग्रेस-राष्ट्रवादी व मनसेकडे त्या-त्या जागेपुरते उमेदवार आहेत. शिवसेनेचे इच्छुक उमेदवार सुरेंद्र शेजवळ यांच्या हत्त्येमुळे निवडणुकीचे राजकीय गणित बदलून गेले आहे.  केंद्रात व राज्यातून कॉँग्रेस - राष्ट्रवादी व मित्रपक्ष सत्तेतून पायउतार झाल्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचा सुस्तपणा व अनुत्साहाचे वातावरण दिसत आहे, तर शिवसेना - भाजपाला ‘उन्हाळ्यात पालवी’ फुटावी असे दिवस आले आहे, तर मनसेकडे प्रत्येक जागेवर इच्छुक आहेत. शिवसेनेकडून अनुसूचित जाती गटातून प्रबळ दावेदार असलेले सुरेंद्र शेजवळ यांची नुकतीच पूर्ववैमनस्यातून हत्त्या झाल्याने राजकीय गणित बदलले आहे. शिवसेनेकडून सर्वसाधारण गटातून मनसेतून शिवसेनेत दाखल झालेले अशोक सातभाई व अपक्ष नगरसेवक राहिल्यानंतर राष्ट्रवादीतून सेनेत दाखल झालेले अ‍ॅड. सुनील बोराडे दोघे प्रबळ दावेदार आहेत. सातभाई हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक तर बोराडे हे पूर्वाश्रमीचे भाजपाचे खंदे कार्यकर्ते होते. येथील उमेदवारी निश्चित करताना सेनेला येथे नक्कीच नाकीनव येणार आहे. इतर मागासवर्ग महिला गटातून राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेल्या रंजना बोराडे, कट्टर शिवसैनिक विक्रम खरोटे यांच्या मातोश्री सुशीला खरोटे, लता बाळासाहेब ढिकले या इच्छुक आहेत. अनुसूचित जाती गटातून मनसेचे नगरसेवकपद रद्द झालेल्या शोभना शिंदे, बाळासाहेब अहिरे, खिलेंद्र मोबीया हे इच्छुक आहे. या गटातून सेनेचे प्रबळ दावेदार असलेले सुरेंद्र शेजवळ यांची हत्त्या झाल्याने अडचण निर्माण झाली आहे. नुकत्याच झालेल्या पोट निवडणुकीत शेजवळ यांच्या मातोश्री मनसेकडून लढल्या होत्या. सर्वसाधारण महिला गटातून विभागप्रमुख शिवा ताकाटे यांच्या पत्नी शीतल ताकाटे, चित्रा ढिकले, मुक्ता पोरजे, वृषाली नाठे इच्छुक आहेत. इतर पक्षांतून दाखल झालेले व पक्षातील जुने कार्यकर्ते यामुळे उमेदवारी ठरवितांना बंडखोरी टाळण्यासाठी सेनेला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. भाजपामध्ये रस्सीखेचभाजपाने निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना पक्षात प्रवेश दिल्याने जुने-नवीन असा वाद निर्माण झाला आहे. सर्वसाधारण गटातुन युवा मोर्चाचे प्रदेश चिटणीस सचिन हांडगे व शिवसेनेतून दाखल झालेले विशाल संगमनेरे इच्छुक आहेत. इतर मागासवर्ग महिला गटातून भाजपा महिला आघाडी अध्यक्ष मंदा फड शिवसेनेकडून निवडणूक लढविलेल्या रंजना तुंगार, सुलोचना बोराडे, छाया मुकुंद आढाव, मीना सानप, चंद्रकला साबळे तर सर्वसाधारण महिला गटातून नगरसेवक मंदाबाई ढिकले, वंदना बोराडे, जिजाबाई बोराडे, किरण शहाणे, उषा शहाणे या इच्छुक आहेत. विशेष म्हणजे जिजाबाई बोराडे व छाया आढाव यांचे आई-मुलीचे नाते आहे. अनुसूचित जाती गटातून शरद मोरे, कुलदीप गवई, बाळासाहेब अस्वले दावेदार आहेत. अपक्ष नगरसेवक पवन पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला असला तरी त्यांची पक्षाच्या मुलाखतीला गैरहजेरी होती. त्यामुळे पवार किंवा त्यांचा भाऊ विशाल याला उमेदवारी दिली जाते किंवा पवन पवार ऐन निवडणुकीत काय भूमिका घेतात यावर प्रभागाच्या निवडणुकीत बरेच काही अवलंबून आहे. पवार यांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला तर इतर पक्षांतील नाराजांच्या मदतीने अपक्षांचा पॅनल निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.