शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनाही करणार गोदावरी आराखडा

By admin | Updated: August 8, 2014 01:52 IST

शिवसेनाही करणार गोदावरी आराखडा

नाशिक : राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील गोदापार्कच्या विकासाला सुरुवात होत असताना, शिवसेनेनेही या प्रकल्पाला प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केली असून, राज्यात शिवसेनेची सत्ता आली तर दक्षिण गंगा गोदावरीच्या विकासाचा महाआराखडा तयार करण्यात येईल अशी तरतूद व्हिजन डॉक्युमेंटमध्ये करण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांनी आज मुंबई येथे केलेल्या सादरीकरणात ही बाब स्पष्ट केली.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने व्हिजन डॉक्युमेंट तयार केले असून, त्याचे सादरीकरण गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले, तसेच नाशिकसह राज्यातील तेरा शहरांतील शिवसेना कार्यालयात थेट पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या डॉक्युमेंटमध्ये नाशिकच्या दृष्टीने दोन ते तीन मुद्दे समाविष्ट आहेत. त्यात गोदावरी नदीच्या विकासाचा महाआराखडा तयार करण्यात येईल, त्याचप्रमाणे धार्मिक महत्त्व लक्षात घेता नाशिकला ‘रिलिजियस हब’ करण्यात येईल, असे डॉक्युमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता असताना त्यावेळी राज ठाकरे यांनी गोदापार्क प्रकल्प राबविण्याची तयारी केली होती. नंतर हा प्रकल्प अर्धवट राहिला होता. त्यानंतर आता मनसेची पालिकेत सत्ता आल्यानंतर राज ठाकरे यांनी रिलायन्स फाउंडेशनच्या माध्यमातून गोदापार्क विकसित करण्यास सुरुवात केली आहे, त्याला व्हिजन डॉक्युमेंटमध्ये एकप्रकारे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी नाशिकच्या शिवसेना कार्यालयातून उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना नाशिकमध्ये शिवसेनेला अनुकूल वातावरण असून, छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच अन्य विरोधकांना धोबीपछाड देऊ, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सांगितले, तर महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनीही शिवसेना संपर्क मोहिमेची माहिती दिली. (प्रतिनिधी)