नाशिक : भाजपाच्या लोकप्रियतेने शिवसेनेच्या पोटात गोळा आला असून त्यामुळेच आजवरची युती तुटल्याचे प्रतिपादन, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मखमलाबाद येथील प्रचार सभेत केले.शुक्रवारी दुपारी भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ दानवे यांची मखमलाबाद येथे सभा झाली. यावेळी ते म्हणाले, शिवसेना शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची भाषा करत आहे; मात्र कर्जमुक्तीने प्रश्न सुटणार नाहीत, शेतकऱ्यांचा शाश्वत विकास व्हावा, यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादीला शेतीतील कळत नसून, कॉँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरल्याची टीकाही यांनी यावेळी केली. सदाभाऊ खोत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचेच आहे, त्यांना भाजपात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचे स्पष्टीकरणही दानवे यांनी या सभेत दिले.
भाजपाच्या लोकप्रियतेमुळे घाबरून शिवसेनेने युती तोडली : रावसाहेब दानवे
By admin | Updated: February 17, 2017 14:00 IST