शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-भाजपकडून मालेगावी जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 00:47 IST

लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाल्याने भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.

मालेगाव : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत आणि धुळे लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांचा विजय झाल्याने भाजप-शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ठिकठिकाणी एकत्र येत एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला.भाजपतर्फे रामसेतू पुलावर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. रामसेतू पुलानजीक श्रीराम मंदिरासमोर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवले. यावेळी भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजनकरून जय भवानी, जय शिवाजी, भारतमाता की जय अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी भाजप सांस्कृतिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नेवीलकुमार तिवारी, नंदू शेवाळे, गजानन बच्छाव, बाळू अहिरे, मुकेश तिवारी, कुणाल पाटील, राजू अहिरे, गोलू वाघ, अक्षय पाटील, पप्पू कापडणे, बंटी पाटील, निशान मंत्री, शरद पवार, गोकुळ वानखेडे, सचिन परदेशी,  बाबूराव परदेशी, राहुल आघारकर, अमित संघवी, ओम गगराणी,अनिल सूर्यवंशी, विलास कोतकर, जयेश भावसार, किशोर गढरी, समीर पाटील, राजू परदेशी, महेश शिंदे, अमित वाघ आदी कार्यकर्ते उपस्थित होते.गेल्या काही दिवसांपासून निकालाची आकडेमोड सुरू होती. गुरुवारी मतमोजणी पार पडून अंतिम निकाल जाहीर झाले. राज्यात शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले. तसेच धुळे मतदारसंघातून युतीचे उमेदवार सुरेश भामरे विजयी झाले. दिवसभर ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या जनसंपर्क कार्यालयात दूरचित्रवाणी (टीव्ही)वर निकालाचे प्रेक्षपण पाहण्यासाठी कार्यकर्त्यांसह नागरिकांनी गर्दी केली होती.सायंकाळी शिवसेनेचे महानगरप्रमुख रामा मिस्तरी, राजू अलिझाड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.भाजपला मिळालेल्या यशाबद्दल मालेगाव येथील वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे पेढे वाटून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष पापन्ना यादव, सचिव रवींद्र कुलकर्णी आदींंसह पदाधिकारी, विक्रेता बांधव उपस्थित होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालdhule-pcधुळे