शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पेन्शनवाढीसाठी शिवसेना आक्रमक

By admin | Updated: April 12, 2017 23:37 IST

विविध मागण्या : क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्तांना निवेदन

सिडको : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करून १९९५ च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सर्वच पेन्शनधारकांना त्वरित पेन्शनवाढ द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अरु ण कुमार यांना दिले.आयुष्यभर काबाडकष्ट करत हजारो रुपये कर भरायचा, भविष्य निर्वाह निधी पगारातून कपात द्यायची आणि निवृत्तीनंतर तुटपुंज्या पेन्शनवर जगण्याची नामुष्की कामगार वर्गावर आली आहे. सेवानिवृत्तांना दुर्लक्षित करून सामाजिक विकास होऊच शकत नाही. सेवानिवृत्तांना त्यांच्या किमान गरजा, औषधे यांचा खर्च निघेल एवढी पेन्शन मिळावी यासाठी विविध स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. शिवसेनेचे नगरसेवक तिदमे यांनी या सेवानिवृत्तांकडून पंतप्रधानांकडे पाठविले जाणारे आणि पेन्शन वाढीचे विनंती अर्ज भरून घेऊन ते पंतप्रधान कार्यालयास पाठविण्यास सुरु वात केली आहे. नाशिक शहरासह देवळा, सटाणा, शिंदे, निफाड अशा विविध भागातील हजारो पेन्शनधारकांनी हे अर्ज भरून दिले आहेत. याच संदर्भात एच.ए.एल. कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी पंतप्रधान कार्यालयाशी ईमेलद्वारे पाठपुरावा सुरू केला आहे. शुक्र वारी प्रवीण तिदमे यांनी क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त अरु ण कुमार यांची भेट घेऊन पेन्शनवाढीसंदर्भात निवेदन देऊन चर्चा केली. सर्वोच्च न्यायालयाने पेन्शनवाढीसाठी आदेश दिले असतानाही कार्यवाही केली जात नसल्याबाबत तिदमे यांनी तक्र ार केली. दिल्लीतील अपर केंद्रीय भविष्य निधी आयुक्तांनीही याबाबत सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेशित केले असल्याचेही नगरसेवक तिदमे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. महागाई आणि वयस्कर भारतीयांची कैफियत लक्षात घेऊन १९९५ च्या कर्मचारी निवृत्ती वेतन योजनेतील सर्वच पेन्शनधारकांना त्वरित पेन्शनवाढ द्यावी, अशी मागणीही केली. आयुक्त कुमार यांनीही पेन्शनधारकांची मागणी मुख्य कार्यालयाकडे सकारात्मकरीत्या पाठविण्याचे आश्वासन दिले. पेन्शनवाढीसाठी आता केंद्र स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे प्रवीण तिदमे यांनी सांगितले. (वार्ताहर)