शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण आफ्रिकेतील पर्वतावर शिवजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:15 IST

छत्रपती शिवरायांचा जयघोष परदेशात दक्षिण आफ्रिकेमध्येही घुमला. सह्याद्रीच्या या शिवप्रेमी मावळ्यांनी टांझानियामधील सर्वात उंच माउंट किलीमांजरो पर्वताच्या शिखरावर शिवजयंती साजरी करून तमाम शिवभक्तांबरोबर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या मोहिमेतील क्षितिज अनिल नांदोडे (भावसार) याने नाशिकचे नाव रोशन केले आहे.

दत्ता दिघोळेनायगाव : छत्रपती शिवरायांचा जयघोष परदेशात दक्षिण आफ्रिकेमध्येही घुमला. सह्याद्रीच्या या शिवप्रेमी मावळ्यांनी टांझानियामधील सर्वात उंच माउंट किलीमांजरो पर्वताच्या शिखरावर शिवजयंती साजरी करून तमाम शिव-भक्तांबरोबर महाराष्ट्राची मान उंचावली आहे. या मोहिमेतील क्षितिज अनिल नांदोडे (भावसार) याने नाशिकचे नाव रोशन केले आहे.  जगातील सर्वोच्च सात शिखरांपैकी एक असलेल्या आफ्रिकेतील ५,८९५ मीटर उंचीच्या माउंट किलीमांजरो पर्वताच्या माथ्यावर गिर्यारोहकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली. त्याठिकाणी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक केला. अनिल चंद्रकांत वाघ (३३), क्षितिज अनिल भावसार (नांदोडे, २७) रवि मारुती जांभूळकर (३०), आणि कोल्हापूर येथील प्रवीण चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी ही धाडसी मोहीम फत्ते केली. या प्रवासाबद्दल बोलताना रवि जांभूळकर व क्षितिज नांदोडे म्हणाले की, शिखर चढणे व उतरणे अशी एकूण सहा दिवसांची ही मोहीम होती. मुंबईतून दक्षिण आफ्रिकेला रवाना झालो. दक्षिण आफ्रिका, टांझानिया येथील सर्वात उंच किलीमांजरो या पर्वतावर शंकू, कोंबो, मवेन्झी आणि शिरा हे निष्क्रिय ज्वालामुखी आहेत. हा पर्वत सर करण्याचे धाडस खूप कमी गिर्यारोहकांनी दाखविले आहे. दि. १६ फेब्रुवारीला आम्ही किलीमांजरो नॅशनल पार्क येथून मोहिमेस सुरुवात केली, पहिला मुक्काम मदर हटला नऊ किलोमीटरचे पदभ्रमण करून विश्रांती घेतली. दुसºया दिवशी पहाटे दि. १७ फेब्रुवारीला पुढील वाटचाल चालू केली. जवळपास ११ किलोमीटर अंतर कापून आम्ही होरोम्भो हटला मुक्काम केला. दि. १८ फेब्रुवारीला आम्ही खूब हटला पोहचलो व रात्री १२ वाजेपर्यंत आराम करून रात्री १ वाजता पदभ्रमण चालू करून शेवटच्या टप्प्याकडे प्रस्थान केले. पहाटे ७ वाजता सर्वोच्च माथ्यावर पाऊल ठेवले.  सह्याद्रीच्या या मावळ्यांनी शिवजयंतीच्या दिवशी येथे छत्रपती शिवरायांच्या दोन फुटी पुतळ्याचा अभिषेक करून अभिवादन केले. या मोहिमे-साठी बेंगलोर माउंटिंग क्लबचे नीरज माळवे व कीर्ती ओसवाल यांचे मार्गदर्शन केले. क्षितिजसह सर्व सहकारी बुधवारी (दि. २८) मुंबई विमानतळावर येणार आहे.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज