शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एका तासातच संपली ‘शिवभोजन थाळी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 00:15 IST

जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देप्रतिसाद : दुसऱ्या दिवशीही केंद्रांबाहेर लागल्या रांगा; शहरातील तीनही केंद्रांवर गर्दी

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील कॅन्टीनच्या जागेत सुरू करण्यात आलेल्या महाराष्टÑ शासनाच्या शिवभोजन थाळीला दुसºया दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. योजनेच्या दुसºया दिवशीच अवघ्या तासाभरात १५० थाळी संपल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे या थाळीसाठी सकाळी ११ वाजेपासूनच अनेक गरजूंनी रांगा लावल्याचे दिसून आले. शहरातील अन्य केंद्रांमध्येदेखील शिवभोजन थाळीला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आला आहे.प्रजासत्ताकदिनी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील ठिकाणी शिवभोजन थाळीचे उद्घाटन आमदार देवयानी फरांदे यांच्या हस्ते झाले . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतील या योजनेला पहिल्या दिवसांपासून चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून आले. शहरात जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे कॅन्टीन, पंचवटीतील बाजार समिती येथील बळीराजा रेस्टॉरंट व नाशिकरोड रेल्वेस्थानक बाहेरील दीपक रेस्टारंट या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात झाली. मालेगावला बाजार समितीत येथील केंद्रालाही सुरुवात झाली. प्रत्येक केंद्राला दिवसाला दीडशे थाळीची मर्यादा देण्यात आली आहे.शिवभोजन योजनेच्या शुभारंभानंतर दुसºया दिवशी सर्वच केेंद्रांवर लाभार्थ्यांची गर्दी दिसून आली. विशेषत: जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील केंद्रावर सकाळी ११.३० वाजेपासूनच रांग लागली होती. थाळींची तसेच वेळेचीही मर्यादा असल्याने प्रथम येणाºयास प्राधान्य याप्रमाणे योजनेचा लाभ दिला जात असल्याने पहिल्या तासाभरातच १५० थाळींचा कोटा पूर्ण झाला. त्यामुळे अन्य लोकांना माघारी परतावे लागले. या योजनेच्या शुभारंभापासून थाळीविषयीची चर्चा सुरू असून, या थाळीचाआस्वाद घेण्यासाठी दुसºया दिवशी विशेष गर्दी दिसून आली. पहिल्या दिवशी पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा असल्याने आणि या ठिकाणी मोठी गर्दी झाल्यामुळे अनेकदा केंद्रापर्यंत पोहोचता आले नव्हते. दुसºया दिवशी मात्र सकाळी ११ वाजेपासूनच केंद्राबोहर लाभार्थी दिसून आले.शुभारंभाच्या दिवशी जिल्ह्यातील चारही केंद्रांवरील ६०० थाळींपैकी ५५९ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. त्यानुसार शहरातील तीनही केंद्रांवरील शिवभोजन थाळी मिळवण्यासाठी गर्दी दिसून आली. मालेगावला मात्र पहिल्या दिवशी ११७ लाभार्थ्यांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला. शहरातील तीनही केंद्रांवर दुसºया दिवशीदेखील सर्वसामान्य नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली. लाभाार्थ्यांची होणारी गर्दी लक्षात घेता नागरिकांना रांगेत कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पुरवठा विभागाने केले आहे.

टॅग्स :foodअन्न