शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

शिर्डीची विमानसेवा नाशिकसाठी उपयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:15 IST

सुवर्ण त्रिकोणातील नाशिक म्हणून या शहराचे महत्त्व अबाधित असले तरी येथून अद्याप हवाई सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने शिर्डीच्या विमानतळाला प्राधान्य दिले आणि येथून सेवा सुरू झाली. शिर्डीच्या विमानतळामुळे नाशिकच्या हवाई सेवेचा प्राधान्यक्रम आता हटला असला तरी यातूनही मार्ग काढता येईल. नाशिक-शिर्डीदरम्यान वाहतुकीसाठी एक्स्प्रेस कॉरीडॉर केल्यास नाशिकच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळू शकेल.

धैर्यशील वंडेकर।सुवर्ण त्रिकोणातील नाशिक म्हणून या शहराचे महत्त्व अबाधित असले तरी येथून अद्याप हवाई सेवा सुरू झालेली नाही. ही सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच केंद्र सरकारने शिर्डीच्या विमानतळाला प्राधान्य दिले आणि येथून सेवा सुरू झाली. शिर्डीच्या विमानतळामुळे नाशिकच्या हवाई सेवेचा प्राधान्यक्रम आता हटला असला तरी यातूनही मार्ग काढता येईल. नाशिक-शिर्डीदरम्यान वाहतुकीसाठी एक्स्प्रेस कॉरीडॉर केल्यास नाशिकच्या अर्थव्यवस्थेस चालना मिळू शकेल.  नाशिकमध्ये ओझर येथे विमानतळ बांधून सज्ज आहे, परंतु येथून विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. ही सेवा सुरू व्हावी यासाठी अनेक संस्था तसेच उद्योग संस्था प्रयत्नशील आहेत. नाशिकसह राज्यातील आणि देशातील विमानतळांच्या धावपट्ट्यांचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी केंद्र सरकारने उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक ही सेवा सुरू केली आहे. त्यानुसार देशातील ४१४ विमनातळ व विमान सेवेसाठी असलेल्या धावपट्ट्या अधिसूचीत केल्या आहेत. महाराष्टÑातील २९ धावपट्ट्यांचा त्यात समावेश आहे. राज्य सरकारने नाशिक, कोल्हापूर, अमरावती, नांदेड, जळगाव, गोंदिया, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या नऊ शहरांना प्राथमिकता दिली होती. त्यानुसार नांदेडला ही सेवा सुरू झाली असून, नाशिकमध्ये ओझर येथून सेवा सुरू करण्यासाठी एअर डेक्कन कंपनीने स्वारस्य दाखवले होते. सप्टेंबर महिन्यापर्यंत ही सेवा सुरू असणे आवश्यक असतानाही मुंबईच्या विमानतळावर आवश्यक असलेले स्लॉट म्हणजेच लॅँडिंग आणि टेक आॅफसाठी निर्धारित वेळ न मिळाल्याने ही सेवा सुरू होऊ शकलेली नाही. नाशिकला मुंबईत वेळ मिळेल न मिळेल परंतु तोपर्यंत नाशिक ते पुणे सेवा सुरू करण्याची गरज असून त्यासाठी पाठपुरावा केला तर किमान विमानतळ सुरू होऊ शकते.  शिर्डी येथे सुरू झालेल्या सेवेमुळे आता नाशिकचे नाव मागे पडले आहे. नाशिकचे महत्त्व पटविण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न झाले नाहीत. सरकारही कमी पडले हे स्पष्ट होते. शिर्डीच्या सेवेचा नाशिकवर प्रतिकूल परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा नाशिकला लाभ मिळवून घेण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. शिर्डीतील विमानसेवेमुळे हॉटेल, रेस्तरॉँ, पर्यटन, कार रेंटल्स, मिटिंग्ज, कॉन्फरन्स यांसह इतर उद्योग धंद्यांसाठी नाशिककरांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन नाशिक- शिर्डीसाठी एक्स्प्रेस कॉरीडॉर बनविल्यास या क्षेत्रातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. तसेच व्यावसायिक सुसंघटित पद्धतीने शिर्डीला विमानाने येणाºया भाविकांना छोट्या अवधित नाशिकमधील जास्तीत जास्त धार्मिक व पर्यटन ठिकाणे दाखविण्यासाठी एखादे किफायतीर शिर्डी एअरपोर्ट- नाशिक शिर्डी एअरपोर्ट पॅकेज तयार केल्यास ते लोकप्रिय ठरू शकते.  शिर्डीहून विमानसेवा सुरू करणे हे निश्चितच स्वागतार्ह आहे. परंतु नाशिकच्या शाश्वत व दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने येथून मोठ्या क्षमतेची विमानसेवा असणे यास कोणत्याही प्रकारचा पर्याय ठरूच शकत नाही.  (लेखक हवाई क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत.)