शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डीतील दुहेरी खून खटल्याचा आज निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 00:57 IST

नाशिक : शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा गुरुवारी (दि़ ३) या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता असून, या गुन्ह्यामध्ये शिर्डीतील कुख्यात गुन्हेगार पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख (३२) याच्यासह त्याच्या टोळीतील २४ गुंडांचा संशयितांमध्ये समावेश असून, त्यांच्यावर मोक्कान्वये गुन्हा दाखल आहे.

ठळक मुद्देविशेष मोक्का न्यायालय : २०११ची घटना कुख्यात पाप्या शेखसह २४ संशयित

नाशिक : शिर्डीतील प्रवीण गोंदकर व रचित पटणी या दोन तरुणांचे खंडणीसाठी करण्यात आलेले अपहरण व खून खटल्याची सुनावणी नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात पूर्ण झाली आहे़ विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश सुरेंद्र आर. शर्मा गुरुवारी (दि़ ३) या खटल्याचा निकाल देण्याची शक्यता असून, या गुन्ह्यामध्ये शिर्डीतील कुख्यात गुन्हेगार पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख (३२) याच्यासह त्याच्या टोळीतील २४ गुंडांचा संशयितांमध्ये समावेश असून, त्यांच्यावर मोक्कान्वये गुन्हा दाखल आहे.१४ व १५ जून २०११ रोजी रात्रीच्या सुमारास संशयितांनी विलास पंढरीनाथ गोंदकर (४७, रा़ बिरेगाव रोड, शिर्डी, अहमदनगर) यांचा मुलगा प्रवीण व त्याचा मित्र रचित पटणी या दोघांना खंडणीच्या मागणीकरिता व तडजोड करण्यासाठी सुरभि हॉटेलमध्ये बोलावून घेतले़ यानंतर या दोघांचे स्कॉर्पिओ वाहनातून अपहरण करून अज्ञातस्थळी व तेथून निमगाव येथील वाल्मीक पावलस जगताप यांच्या शेतात नेऊन त्यांना रात्रभर मारहाण करून अत्याचार केले़ संशयितांनी गोंदकर व पटणी यांना अनैसर्गिक कृत्य करण्यास भाग पाडून त्यांचे फोटोही काढले़ या मारहाणीमुळे गोंदकर व पटणी या दोघांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची नग्नावस्थेतील मृतदेह शिर्डीतील हॉटेल पुष्पांजलीसमोर नेऊन टाकली़ या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात पाप्या शेखसह त्याच्या साथीदारांविरोधात खंडणी, अपहरण व खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता़तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी या गुन्ह्णाचा सखोल तपास करून २४ पैकी २३ संशयितांना अटक केली आहे यामध्ये पाप्या शेख (२८, रा़ कालिकानगर, शिर्डी, अहमदनगर) याचा प्रमुख सहभाग असल्याचे समोर आले़ पाप्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर विविध प्रकारचे २२ गुन्हे दाखल असल्याने या सर्वांवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली़ शिर्डीतील पाप्याची दहशत पाहता हा खटला नाशिकच्या विशेष मोक्का न्यायालयात चालविण्यात आला़यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड उज्ज्वल निकम व अ‍ॅड. अजय मिसर यांची नियुक्ती केली़ यामध्ये निकम यांनी दोन, तर मिसर यांनी ४३ साक्षीदार तपासले़ या खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायाधीश शर्मा हे गुरुवारी (दि. ३) अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे. दुहेरी खुनातील संशयितांची नावे पाप्या ऊर्फ सलीम ख्वाजा शेख, विनोद सुभाष जाधव (३१), सागर मोतीराम शिंदे (१९), सुनील ज्ञानदेव लहारे, आबासाहेब बाबासाहेब लांडगे (२६), माउली ऊर्फ ज्ञानेश्वर शिवनाथ गुंजाळ (२२), गनी मेहबूब सैयद (३०), चिंग्या ऊर्फ समीर निजाम पठाण, रहिम मुनावर पठाण (२३), सागर शिवाजी काळे (२०), राजेंद्र किसन गुंजाळ (३३), इरफान अब्दुल गनी पठाण (२०), नीलेश देविलाल चिकसे (१९), मुबारक ऊर्फ लड्ड्या ख्वाजा शेख (३२), वाल्मीक पावलस जगताप (४२), निसार कादीर शेख (२४), दत्तात्रय बाबूराव कर्पे (३५), भरत पांडुरंग कुरणकर (४९), बिसमिल्ला मर्द पाप्या ऊर्फ सलीम शेख (२५), संदीप श्यामराव काकडे (२४), हिराबाई श्यामराव काकडे (४९), मुन्ना गफूर शेख (२४), राजू शिवाजी काळे (२१), प्रकाश सुरेश अवसरकर (२२) या सर्व संशयितांविरोधात अपहरण, खंडणी, खुनासह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसला तरी पोलिसांनी सबळ परिस्थितीजन्य पुरावे गोळा केले आहेत़ या पुराव्यांच्या आधारेच सरकारी वकिलांना आरोप सिद्ध करावे लागत होते़ या खटल्यात संशयितांकडून जप्त केलेले मोबाइल, त्यातील क्लिप्स, संभाषण, प्रवीण आणि रचितचे फोटो, संशयितांचे कॉल रेकॉर्ड, गुन्ह्णात वापरलेली हत्यारे आदी पुरावे पोलिसांनी जप्त केले आहेत़ याबरोबरच संशयित तसेच मयत दोन्ही युवकांच्या अखेरच्या हालचालींची कडी जुळवण्यासोबत सर्व घटनाक्रमांची सांगड घालण्यात आली. साक्षीदारांना पोलीस संरक्षणकुख्यात पाप्या शेखसह टोळीवर २२ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत़ दहशतीमुळे साक्षीदार संशयितांविरोधात साक्ष देण्यास धजावत नव्हते त्यामुळे काही साक्षीदारांना पोलीस संरक्षण, तर काही साक्षीदारांच्या साक्ष ही संशयितादरम्यान पडदा ठेवून नोंदविण्यात आल्या़ उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या खटल्याचे कामकाम दैनंदिन स्वरूपात सुरू होते़