सातपूर : टोलनाके बंद करावेत, यासह अन्य मागण्यांसाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने चक्काजाम आंदोलन सुरू केल्याने त्याचा परिणाम उद्योग क्षेत्रावर झाला असून, उत्पादित माल वेळेवर पोहोचला नाही, तर मोठे आर्थिक नुकसान होण्याची भीती उद्योजकांनी व्यक्त केली आहे.उद्योग क्षेत्रावर जागतिक मंदीचे सावट अद्यापही विरलेले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटात सापडलेल्या उद्योगांना उद्योग चालविणे अवघड झालेले आहे. दिवाळी सण तोंडावर आल्याने आॅटोमोबाइल उद्योगांना थोड्या प्रमाणात आॅर्डर्स मिळालेल्या आहेत. त्या आॅर्डर्स पूर्ण करून उत्पादित माल संबंधित मोठ्या उद्योगांना वेळेवर पोहोचणे गरजेचे झालेले आहे. ट्रान्सपोर्ट असोसिएशनने अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे नाशिक औद्योगिक वसाहतीतून जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर, तसेच अन्य राज्यांत उत्पादित माल वेळेवर पोहोचू शकणार नसल्याने उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. मंदीबरोबरच या चक्काजाम आंदोलनामुळे उद्योग अडचणीत सापडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)
मालवाहतूकदारांचा संप
By admin | Updated: October 3, 2015 23:01 IST