शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे येथील टोलवसुली अन्यायकारक वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 01:04 IST

नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.

ठळक मुद्दे नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरणआर्थिक लुबाडणूक केली जात आहे

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोलवसुली अन्यायकारक आहे. टोलवसुली करताना हलके, मध्यम व अवजड असे वाहनांचे वर्गीकरण करून टोलवसुली करावी, अशी मागणी शिवसेना अवजड वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात केली आहे.प्रकल्प संचालक सुनील भोसले यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरणातील काही काम अपूर्ण असतानाही टोलवसुली केली जात आहे. मात्र टोलवसुली करताना शासन मान्यतेनुसार हलके, मध्यम व अवजड वाहन असे योग्य ते वर्गीकरण करण्यात आलेले नाही. टोलवेज कंपनीकडून हलके व अवजड वाहन असेच वर्गीकरण करण्यात आलेले आहे. त्यामुळे मध्यम वजनाच्या वाहनांकडूनदेखील अवजड वाहनांच्या दराप्रमाणे टोलवसुली करून आर्थिक लुबाडणूक केली जात आहे. महामार्गालगतच्या गावामध्ये पिकअप शेड, पथदीपांची व्यवस्था नाही. प्रवासी व वाहनाचालकांसाठी शौचालय, स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही. टोलनाक्यावर क्रेन-रुग्णवाहिका या उपलब्ध नाही. नाशिक, सिन्नर या औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या कामगारांना घेऊन जाणाºया-येणाºया बसेस व इतर वाहनांना योग्य ती सवलत देऊन पास द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर प्रदेश उपसचिव संजय गायकर, जिल्हाअध्यक्ष लक्ष्मण पाटील, दीपक ताकाटे, किशोर निकम, विश्वास लांबे, मनोज उदांवत, पकंज बिर्ला, शंकर वारुंगसे, पिंटू शिंदे, प्रशातं शिरोडे, अविनाश भुसे, गणेश मैड, चव्हाण आदींच्या सह्या आहेत.