शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

शिंपी समाजातर्फे संत नामदेव विठ्ठल मंदिरात प्रतिमापूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 01:09 IST

शहरातील जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरासह उपनगरातील विविध मंदिरांमध्ये समस्त शिंपी समाज संस्थेतर्फे संत नामदेव महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहत साजरा करण्यात आला.

नाशिक : शहरातील जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरासह उपनगरातील विविध मंदिरांमध्ये समस्त शिंपी समाज संस्थेतर्फे संत नामदेव महाराज यांचा जयंती सोहळा उत्साहत साजरा करण्यात आला. विविध मंदिरांमध्ये प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेपूजन करून संत नामदेव महाराज यांना वंदन करण्यात आले.  मेनरोड येथील संत गाडगे महाराज पुतळा येथे सकाळी माजी महापौर विनायक पांडे व अरुण नेवासकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शहरातील जुने नाशिक, पंचवटीसह, विविध ठिकाणच्या संत नामदेव विठ्ठल मंदिरात पूजन व महाआरती करण्यात आली. यावेळी शिंपी समाज संस्था प्रदेशाध्यक्ष अरुण नेवासकर यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी संत नामदेव शिंपी समाज उन्नती संस्था, नामदेव भक्त परिषद, नामदेव ब्रिगेड, नामदेव प्रतिष्ठान व समस्त शिंपी समाज संस्थाप्रणीत संत नाम लीला ग्रुप नाशिक सहपरिक्षेत्रातील विविध मंडळाच्या समाजबांधव पदाधिकाऱ्यांसह नंदन रहाणे, प्रशांत निरगुडे, ज्ञानेश्वर औसरकर, प्रदीप जगताप, सतीश भांबारे, सोमनाथ गायकवाड, प्रवीण पवार, रमेश चांदोले, त्र्यंबक काळे, नंदू गंगावणे, रमेश बकरे, सुधाकर वारे, योगेश वारे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.दिवसभर सांप्रदायिक कार्यक्रमाची मेजवानी  जुने नाशिक येथील संत नामदेव विठ्ठल मंदिरात सालाबादप्रमाणे संत नामदेव यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त दिवसभर विविध सांप्रदायिक कार्यक्रम झाले. सकाळी ६ ते ८ काकडारती भजन व त्यानंतर ८ ते १० या कालावधित महिला मंडळाचे दैनिक हरिपाठ व भजन झाले. रात्री ८ ते ९ सुप्रसिद्ध बासरीवादक मोहनजी उपासनी यांचे बासरीवादन व गायन रंगले. त्यानंतर महाआरती व महाप्रसाद झाल्यानंतर श्री संत नामदेव भजनी मंडळ व म्हसरूळ भजनी मंडळाचा हरिजागर झाला.संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा जयंती उत्सव तथा कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर रामकुं डावर दीपोत्सवाने साजरा करण्यात आला. त्यामुळे रामकुंड परिसर उजळून निघाला होता. रामकुं डावर सालाबादप्रमाणे संत नामदेव महाराजांची प्रतिकृती दीपोत्सवाने सजवून त्यांच्या अभंगांचे सामूहिक गायन यावेळी भक्त परिवाराकडून करण्यात आले. यावेळी नाशिकमधील संत नामदेव शिंपी समाज उन्नती संस्था, नामदेव भक्त परिषद, नामदेव ब्रिगेड, नामदेव प्रतिष्ठान व समस्त शिंपी समाज संस्थाप्रणीत संत नाम लीला ग्रुपसह नाशिक सहपरिक्षेत्रातील विविध मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जयंती महोत्सवात सहभाग घेतला.

टॅग्स :Nashikनाशिक