शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिमला मिरची घेऊन गेले अन् रिकाम्या हाती परत आले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST

शेतकरी आपल्या शेतात कोणत्या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी टोमॅटो, पोळ कांदा ...

शेतकरी आपल्या शेतात कोणत्या पिकातून चार पैसे मिळतील या आशेने वेगवेगळी पिके घेण्याचा प्रयत्न करतो. दरवर्षी टोमॅटो, पोळ कांदा या पिकांना फाटा देऊन जळगाव नेऊर येथील राहुल ठोंबरे या शेतकऱ्याने २२ गुंठे क्षेत्रावर ‘आशा’ या वाणाची सिमला मिरचीची लागवड केली. लागवड केल्यापासून साधारणपणे आतापर्यंत रोपे, तार, बांबू, मल्चिंग पेपर, औषधे, खते असा साधारणपणे ७० ते ८० हजार रुपये खर्च करून, गेली १५ दिवसांपासून म्हणजे ५० व्या दिवसानंतर शिमला मिरची सुरू झाली. मागील हप्त्यात ११ किलोच्या कॅरेट ११५ रुपयाचा भाव मिळाला त्यात मजुरी व भाडे सुटले होते; पण परंतु नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत १७५ कॅरेट शिमला मिरची नेली असता एका कॅरेटला अवघा ३५ रुपये भाव मिळाला, म्हणजे ३ रुपये किलो. त्याचे ६,१२५ रुपये हाताशी आले. त्यात ५२५ रुपये हमाली जाता शेतकऱ्याच्या पदरात ५ हजार ५९९ रुपये पडले त्यात गाडीभाडे ३ हजार व तोडण्यासाठी एका कॅरेटला १० रुपये असे ४ हजार ७५० रुपये खर्च आलेला असताना शेतकऱ्याला मात्र ८४९ रुपयावर समाधान मानावे लागले. कोरोना संकटानंतर शेतकऱ्यांपुढे भाजीपाला पिकांची मातीमोल भावाने विक्री हे मोठे संकट उभे राहिले असून त्या पैशातून शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने कर्ज कसे फेडावे व कोणती पिके घ्यावी हा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

भाजीपाला फेकून देण्याची वेळ

शेतकऱ्यांनी आपल्या जवळ असलेल्या थोड्याफार पाण्यावर शिमला मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, गिलके, काकडी, कोथिंबीर अशी पिके घेण्याचा प्रयत्न केला; परंतु या भाजीपाल्याला आज मात्र शेतकऱ्यांना बाजार भावाअभावी फेकून देण्याची वेळ आलेली आहे. त्यातून खर्चदेखील वसूल होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिलेला आहे.

कोट...

यावर्षी साठवलेल्या पाण्यावर इतर पिकांकडे दुर्लक्ष करून शिमला मिरचीची लागवड केली. मोठ्या मेहनतीने शिमला मिरचीची नीगा राखून मिरचीही चालू झाली, परंतु आता मिळत असलेल्या भावातून केलेला खर्चही वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून उसनवारीने आणलेले पैसे कसे फेडावे, हा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.

- राहुल ठोंबरे, शिमला मिरची उत्पादक

फोटो - १९ जळगावनेऊर १

190821\19nsk_13_19082021_13.jpg

शिमला मिरची