शहरं
Join us  
Trending Stories
1
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
2
चिनी शस्त्रे 'फुसकी' निघाली, पाकिस्तनाने अमेरिकेच्या दारात 'झोळी' पसरली; US च्या 'या' घात अस्त्रांवर पाकचा डोळा!
3
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
4
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
5
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
6
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
7
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
8
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
9
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
10
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा
11
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
12
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
13
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
14
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
15
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
16
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
17
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
18
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
19
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
20
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण

लॉकडाऊनमध्ये ‘ती’ धावली अडीच हजार गर्भवतींच्या मदतीला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:22 IST

नाशिक : लॉकडाऊन काळात प्रसूतीकळा सोसणाऱ्या आदिवासी गाव, पाड्यांवरील स्त्रियांच्या मदतीला राज्य सरकारची ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून गेली. प्रसूतीची वेळ अत्यंत समीप आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ११ गर्भवती महिलांची प्रसूती डॉक्टरांनी यशस्वीरीत्या रुग्णवाहिकेतच केली. तसेच २ हजार ४११ गर्भवती स्त्रियांना जवळच्या शासकीय रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने प्रसूतीच्या कळा सुस' झाल्या.

नाशिक : ( अझहर शेख )लॉकडाऊन काळात प्रसूतीकळा सोसणाऱ्या आदिवासी गाव, पाड्यांवरील स्त्रियांच्या मदतीला राज्य सरकारची ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून गेली. प्रसूतीची वेळ अत्यंत समीप आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ११ गर्भवती महिलांची प्रसूती डॉक्टरांनी यशस्वीरीत्या रुग्णवाहिकेतच केली. तसेच २ हजार ४११ गर्भवती स्त्रियांना जवळच्या शासकीय रुग्णालयात वेळीच दाखल केल्याने प्रसूतीच्या कळा सुस' झाल्या. जननी-शिशू सुरक्षेसाठी प्रसूतीसमयी अत्यावश्यक व तातडीची वैद्यकीय सेवा मिळणेही तितकेच गरजेचे असते अन्यथा माता-बालक यांची सुरक्षा धोक्यात येते. त्यामुळे राज्य शासनाने आपत्कालीन वैद्यकीय मदतीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘१०८’ रुग्णवाहिकेच्या चाकांना कोरोनाच्या संकटकाळात अधिकच गती आली. गावपातळीवरून कोरोना रुग्णांची ने-आण करण्यापासून अन्य अपघातांसह महिलांच्या प्रसूतीसाठी धावाधाव करत सेवा पुरवितांना जिल्ह्यातील एकूण ४६ रुग्णवाहिकांचे चालक (पायलट) व डॉक्टरांनी चोखपणे आपली भूमिका बजावली. ४६ पैकी १४ रु ग्णवाहिका कोरोना रुग्णांसाठी राखीव, तर उर्वरित ३२ रुग्णवाहिकांकडून अन्यप्रकारच्या सर्व घटकांना वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. आदिवासी भागांमध्ये प्रसूतीबाबत महिलांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाइकांमध्ये फारशी जागृती नसल्यामुळे अत्यंत अखेरच्या टप्प्यात प्रसूतीसाठी तेथील महिलांची धावपळ होते.कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्याने मार्चच्या पंधरवड्यापासूनच राज्यात सर्वत्र लॉकडाऊन घोषित केले गेले. यामुळे अशाप्रसंगी तातडीची वैद्यकीय सेवा मिळविण्यासाठी खासगी वाहनेसुद्धा जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांत उपलब्ध होत नव्हती. अशा कठीण प्रसंगात आदिवासी भागातील गर्भवती स्त्रियांच्या मदतीला ‘१०८’ची रुग्णवाहिका धावून गेली.------------------------------जिल्ह्यातील दिंडोरी, उमराळे, कळवण, त्र्यंबकेश्वर, हरसूल, पेठ या परिसरांतील आदिवासी गाव, पाडे, वस्तींवर गर्भवती महिलांची हेळसांड थांबवितांना ‘१०८’च्या रुग्णवाहिकाचालक व डॉक्टरांची मोठी कसरत होते.---------------------दुर्दशा झालेल्या रस्त्यांवरून खड्ड्यांतून वाट शोधत रुग्णवाहिका दारापर्यंत पोहोचविणे आणि रुग्णाला ‘रेस्क्यू’ करणे हे अत्यंत जिकिरीचे काम आदिवासी भागात लिलयापणे पार पाडले जात आहे.-----------------------जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांमध्ये सेवा पुरवितांना अधिक आव्हानांचा सामना करावा लागतो. या भागात ११ गर्भवती महिलांची प्रसूती रुग्णवाहिकेतच यशस्वीपणे पार पाडली. गर्भवती महिलांसह अन्य आपत्कालीन स्थितीत ‘१०८’ टोल-फ्री क्र मांकावरून सहजरीत्या मोफत रुग्णवाहिकेसह अन्य वैद्यकीय सेवा सहज उपलब्ध होते.-डॉ. आश्विन राघमवार, जिल्हा व्यवस्थापक, नाशिक

टॅग्स :Nashikनाशिक