शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

जळगावला बिबट्याच्या हल्ल्यात शेळ्या ठार

By admin | Updated: March 26, 2017 00:31 IST

निफाड : तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली.

निफाड : तालुक्यातील जळगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्याची घटना घडली. जळगाव येथील भरत भास्कर वडघुले हे जुन्या सुंदरपूर रोडलगत राहतात. त्यांच्या घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये त्यांच्या मालकीच्या ८ ते १० शेळ्या बांधलेल्या होत्या. शनिवारी (दि. २५) पहाटे ४ वाजेच्या सुमारास वडघुले यांच्या घरातील सदस्याला जाग आली. त्यास घराबाहेर बिबट्या आणि एक तिचे बछडे दिसून आले. त्यांनी आरडाओरड केली. वडघुले कुटुंबीय तातडीने घराबाहेर आले व ट्रॅक्टर चालू करून त्यांनी ट्रॅक्टरचा अवाज व दिवे चालू केले. बिबट्याची मादी व एक बछडे त्यांना दिसून आहे. परंतु ट्रॅक्टरच्या आवाजामुळे बिबट्यासह बछडा शेजारी उसाच्या शेतात पसार झाला. वडघुले यांनी पत्र्याच्या शेडमध्ये पाहिले असता एक शेळी बिबट्याने ठार केलेली दिसली, तर दुसरी एक शेळी बिबट्याने नेल्याचे आढळून आले. येवला वन विभागास सदरची घटना कळवण्यात आली. येवला विभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी भगवान ढाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक दत्तू अहेर, भय्या शेख, विजय लोंढे आदिंच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. गेल्या शुक्रवारी (दि. १७) याच बछड्याने जळगाव-काथरगाव रोडवर मोटारसायकलचा पाठलाग करून एका महिलेला जखमी केले होते. बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी जळगाव येथे वनविभागाकडून पिंजारा लावण्यात आला आहे. (वार्ताहर)नांदगाव : तालुक्यातील पोखरी जळगाव बु।। शिवारात कांद्याच्या शेतात दडून बसलेल्या बिबट्याच्या बछड्याला सायंकाळी गुंगीच्या औषधाचे इंजेक्शन मारल्यानंतर पकडण्यात आले. मन्याड नदीच्या तीरावर राठोड यांच्या शेतातील कांद्याच्या पिकात बिबट्या बसला होता. कोणाचीही त्याच्या जवळ जाण्याची हिंमत होत नव्हती. सायंकाळच्या सुमारास गुंगीच्या औधषाचे इंजेक्शन मारून त्यास बेशुध्द करण्यात आले. त्यानंतर त्याला जेरबंद करण्यात आले. पकडण्यात आलेला बिबट्या नर असून, ते आठ महिन्यांचे पिल्लू आहे. त्याला पकडण्यासाठी डार्टतज्ज्ञ शरद थोरात, अशोक काळे यांचे पथक बोलावण्यात आले होते. सकाळच्या सुमारास बिबट्याची खबर मिळाली तेव्हा तालुका वनाधिकारी विक्रम अहिरे नाशिक येथे बैठकीसाठी गेले होते. ते आल्यानंतर बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेला गती मिळाली.