शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सावानात लवकरच धडाडणार ‘कलायज्ञ’

By admin | Updated: July 27, 2016 00:11 IST

नवा उपक्रम : शहरातील निरनिराळ्या कलावंतांना मिळणार व्यासपीठ

नाशिक : शतकोत्तर अमृतमहोत्सवी वाटचाल पूर्ण करणाऱ्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आता लवकरच ‘सावाना कलायज्ञ’ हा नवा उपक्रम सुरू केला जाणार आहे. ‘पसा नाट्ययज्ञ’च्या धर्तीवरील या उपक्रमाच्या निमित्ताने शहरातील निरनिराळ्या क्षेत्रांतील कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होऊ शकणार आहे.शतकोत्तर अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त सावानाच्या वतीने अनेकविध कार्यक्रम, उपक्रम राबविले जात आहेत. गेल्या वर्षी शहरातील रंगकर्मींना रंगमंच उपलब्ध करून देण्यासाठी ‘पसा नाट्ययज्ञ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. तो यंदाच्या वर्षीही धडाडतो आहे. बारा नाट्यसंस्थांनी दर महिन्याला एकापाठोपाठ एक याप्रकारे आपली नाटके सादर करावीत, त्यासाठी सावाना नाममात्र भाड्यात पसा नाट्यगृह उपलब्ध करून देईल, नाटकाच्या तिकीटविक्रीतून नाटकाचा खर्च निघेल, कलावंत व रसिकांना नाट्यानंद घेता येईल, अशी ‘नाट्ययज्ञ’ची योजना आहे. याच धर्तीवर आता ‘सावाना कलायज्ञ’ नावाचा उपक्रम पदाधिकाऱ्यांच्या विचाराधीन आहे. नृत्य, गायन, वादन, चित्र, शिल्प आदि क्षेत्रांतील विविध कलावंतांना दर महिन्याला त्यांची कला सादर करण्यासाठी निमंत्रित करणे, त्यातून संस्थांना कलाविष्काराची संधी देणे व नाशिककरांना उत्तमोत्तम कार्यक्रमांचा लाभ देणे, असा या उपक्रमामागचा उद्देश आहे. या उपक्रमाचा आराखडा तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. यातील नृत्य, गायन, वादन या कला कार्यक्रमांच्या रूपात रसिकांसमोर सादर करता येणाऱ्या आहेत. फक्त चित्र व शिल्पकलाविषयक कार्यक्रमांचे स्वरूप नेमके कसे ठेवावे, हे अद्याप झालेले नाही. या कलांची प्रात्यक्षिके आयोजित करून तज्ज्ञांची व्याख्याने ठेवावीत, असाही विचार सुरू आहे. उपक्रमात अनेक कलांचा समावेश करावयाचा असल्याने तो एका वर्षाऐवजी दोन वर्षांचा (२४ महिने) असावा की महिन्यात दोन कार्यक्रम ठेवावेत, याविषयी विचारविनिमय सुरू आहे. येत्या तीन ते चार महिन्यांत या संपूर्ण उपक्रमाचे स्वरूप निश्चित होऊन त्याला प्रारंभ होईल, अशी चिन्हे आहेत. या आगळ्या उपक्रमातून नाशिककर रसिकांना नवी पर्वणी लाभणार असल्याचे कार्यवाह मिलिंद जहागिरदार यांनी सांगितले.