शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

शंभो शंकरा करूणाकरा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 01:15 IST

हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरात शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विवध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळपासूनच भाविकांनी महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भगवान कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.

ठळक मुद्देमहाशिवरात्री : बेल, फुले अपर्ण; भक्तिभावाने गजबजली शिवमंदिरे

नाशिक : हर हर महादेव, बम बम भोले च्या गजरात शहर परिसरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने विवध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. सकाळपासूनच भाविकांनी महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी भगवान कपालेश्वराची पालखी मिरवणूक काढण्यात आली . मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी झाले होते.शहरातील कपालेश्वर, बाणेश्वर, सिद्धेश्वर, नारोशंकर, सोमेश्वरसह परिसरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी केली होती. पहाटे मान्यवरांच्या उपस्थितीत भगवान महादेवाला अभिषेक करून महापूजा करण्यात आली. अनेक मंदिरांच्या परिसरात भाविकांनी प्रसाद म्हणून साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. मंदिर प्रशासनाबरोबरच भाविकांतर्फेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक भाविकांनी यानिमित्ताने नवसपूर्ती केली. सायंकाळी कपालेश्वर मंदिरातर्फे भगवान महादेवाच्या मुखवट्याची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत अनेक भाविक सहभागी झाले होते.सोमेश्वर येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. अनेक विक्रेत्यांनी येथे दुकाने थाटल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. दिवसभर भाविकांची वर्दळ सुरु असल्याने परिसरात अभिषेक, महापूजा आदी कार्यक्रम सुरु होते.महाशिवरात्रीच्या उपवासांसाठी बाजारात कवठ, केळी, रताळी यांची मागणी वाढली होती. यामुळे या फळांच्या भावात काही अंशी भाववाढ झाली असल्याचे दिसून आले. रताळी २० रुपयांपासून ५० रुपये किलोपर्यंत विकली जात होती. रांगेतील भाविक क्षणा क्षणाला हर हर महादेव, बम बम भोलेचा गजर करीत होते. त्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. मंदिर प्रशासनातर्फे भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  सायंकाळी विविध मंदिरांमध्ये भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. भाविकांना दर्शन घेणे सुलभ व्हावे यासाठी मंदिर प्रशासनातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. गोदाघात परिसरात कवठांची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. कवठांना १० ते २० रुपये नगाप्रमाणे भाव मिळत होता. महाशिवरात्रीला कवठ या फळाला विशेषमहत्त्व असल्याने भाविकांकडून कवठांची खरेदी करण्यात आली.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमReligious Placesधार्मिक स्थळे