शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

गडावर शाकांबरी महोत्सव

By admin | Updated: January 17, 2016 21:57 IST

गडावर शाकांबरी महोत्सव

वणी : सप्तशृंगगडावर रविवारपासून (दि. १७) शाकांबरी महोत्सवास भावपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. २३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती न्यासातर्फे देण्यात आली. रविवारी (दि. १७) न्यासाचे सदस्य डॉ. रावसाहेब शिंदे यांच्या हस्ते प्रारंभी नवचंडी पालखी पूजनाने सोहळ्यास सुरुवात करण्यात आली. दिनांक २१ ते २३ जानेवारी या कालावधीत लक्ष्मीनारायण महायागाचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी शाकांबरी महोत्सवासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. वर्षभरात चार नवरात्र येत असतात. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षात शारदीय नवरात्र, चैत्र शुक्ल पक्षात नवरात्री, तृतीय व चतुर्थ नवरात्र माघ व आषाढ महिन्यात साजरी करण्यात येते. देशभरात शाकांबरी देवीची तीन शक्तिपीठे आहेत. राजस्थान राज्यातील सिकर जिल्ह्यातील उदयपूर वाटीजवळ सकरायदेवी, सांभर जिल्ह्यात शाकंभर देवी, तर उत्तर प्रदेशातील मेरठजवळील सहारनपूर येथे ही शक्तिपीठे आहेत. शाकांबरी देवीचे प्रमुख स्थान अरावली पर्वताच्या मध्यावर आहे. शाकांबरी देवीच्या शरीरातून उत्पन्न घटकातून भूतलावरील मानवजातीचे भरणपोषण होते. या कृतज्ञतेच्या भावनेतून शाकांबरी उत्सव साजरा करण्यात येतो, अशी माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राबरोबर परराज्यातील भाविकांची उत्सव सोहळ्यास मोठ्या प्रमाणावर उपस्थिती राहाणार असल्याच्या प्रतिवर्षीच्या अनुभवास अनुसरून योग्य ते नियोजन करण्यात आल्याची माहिती न्यास व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे व सहायक भगवान नेरकर यांनी दिली. (वार्ताहर)