शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:33 IST

कळवण : सांडपाणी ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटारीद्वारे थेट नदी नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. ही समस्या टाळण्यासाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला असून, शालेय परिसरातील सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा शेती व बागेसाठी उपयोगात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

ठळक मुद्देमानूर : शेती व बागेसाठी पाण्याचा वापर होणार

कळवण : सांडपाणी ही समस्या शहरांबरोबर आता ग्रामीण भागालाही भेडसावत आहे. सांडपाणी गटारीद्वारे थेट नदी नाल्यांत सोडले जात असल्याने त्याचा घातक परिणाम आरोग्यावर होतो. ही समस्या टाळण्यासाठी शरद पवार इंटरनॅशनल स्कूलमध्ये सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प तयार करण्यात आला असून, शालेय परिसरातील सर्व सांडपाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी पुन्हा शेती व बागेसाठी उपयोगात आणण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.गुरु दत्त शिक्षण संस्थेच्या मानूर परिसरात शरद पवार इंटरनॅशनल स्कूल, शरद पवार ज्युनिअर कॉलेज, अजितदादा पवार शिक्षणशास्त्र महाविद्यालय, लोकनेते डॉ. जे.डी. पवार कॉलेज आॅफ फार्मसी, कॉलेज आॅफ डी. फार्मसी , बी. फार्मसी, एम. फार्मसी, प्रेरणा फाउण्डेशन आदी शैक्षणिक संकुलांमध्ये २५०० विद्यार्थी शिक्षण घेत असून, निवासी शाळा आहे.या शैक्षणिक संस्थांमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी बंदिस्त गटार करण्यात आली असून, त्या गटारीतून परिसरातील सर्व सांडपाणी एकाच ठिकाणी एकत्र करून तेथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. शुद्धीकरण झालेले पाणी शेती व शालेय परिसरातील बागांना वापरण्यात येणार आहे. पाणी बचत व जल प्रदूषण रोखण्यासाठी पारंपरिक जलशुद्धीकरण प्रक्रि या पद्धतीला आधुनिक यंत्रणेची जोड देऊन अत्यंत उपयुक्त अशा सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन गुरुदत्त शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जे.डी. पवार यांच्या हस्ते करण्यात आले.गुरु दत्त शिक्षण संस्था संचलित शरद पवार इंटरनॅशनल स्कूल ही निवासी शाळा असल्याने व औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात शेकडो विद्यार्थी व विद्यार्थिनी निवासी असल्याने दैनंदिन पाण्याचा वापर होत असल्याने सांडपाणी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम गेल्या सहा महिन्यांपासून हाती घेतले होते, ते पूर्णत्वास आले.