घोटी : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव केंद्रात असलेल्या कवडदरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे धामणगाव केंद्रात चांगले नाव आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून या शाळेला सांडपाण्याच्या समस्यांनी ग्रासले आहे. सदरचे सांडपाणी शाळेच्या मैदानावर साचते आहे. शाळेने या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याचा असफल प्रयत्न केला आहे. सूचना देऊनदेखील तसेच ग्रामपंचायत कवडदरा/भरविर खु. यांना शाळेने निवेदनदेखील दिले आहे. समस्या संपलेली नाही. यावर कवडदरा गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य यांनी सदरील ग्रामस्थांना सतत सूचना करूनदेखील सांडपाण्याची अवस्था तशीच आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, पालक यांनी स्पष्ट केले आहे. काही पालक तर या सांडपाण्याची विल्हेवाट न लावल्यास विद्यार्थी शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था -ग्रुप ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी यांनी याकडे लक्ष न दिल्यास शाळेला टाळे ठोकण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू चंदर रोंगटे व उपाध्यक्ष तानाजी शिंगाडे, संपत रोंगटे, रामभाऊ रोंगटे, कैलास रोंगटे, शशिकांत रोंगटे, अनिल निसरड, गोरख नवले, समाधान रोंगटे, किरण रोंगटे, अशोक पंडित, भगवान पंडित, विष्णू निसरड, हरी लहामटे, सोमनाथ डामसे आदिंनी दिला आहे. (वार्ताहर)
शाळेच्या प्रवेशद्वारातच साचते सांडपाणी
By admin | Updated: July 29, 2016 22:55 IST