शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
"अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
PHOTO: संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

सत्तर ते ऐंशी लाखांची गुंतवणूक : भद्रकाली पोलिसांना निवेदन

By admin | Updated: January 15, 2015 22:45 IST

‘मायक्रो’कडून फसवणूक

नाशिक : केबीसी, विकल्प या पाठोपाठ आता ओडिसा येथील मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंतवणूकदार व ठेवीदारांना विविध ठेव योजनांचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे़ या फसवणुकीबाबत शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गुंतवणूकदार व ठेवीदारांनी भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना निवेदन दिले आहे़ कंपनीने देशभरातील विविध शाखांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली असून, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने जुलै २०१४ मध्ये कंपनीचा परवाना रद्द केला आहे़भद्रकालीतील साक्षी गणेश मंदिराजवळील एकसत्य कॉम्प्लेक्समध्ये गेल्या तीन वर्षांपासून मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे कार्यालय होते़ कंपनीचे मुख्य कार्यालय अन्नपूर्णा, प्लॉट क्रमांक ६८ (पी), रसूलगढ, भुवनेश्वर, ओडिसा येथे असून, नाशिकमधील कार्यालय गेल्या महिनाभरापासून बंद असल्याने गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत़ हातमजूर, कामगार यांसह नागरिकांनी कंपनीच्या आवर्तक ठेव योजना, मुदत ठेव योजना, मासिक ठेव योजनेमध्ये सुमारे सत्तर ते ऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे़ कंपनीचे कार्यालय बंद असल्याने अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता सीबीआय चौकशी, महाव्यवस्थापकाला अटक, चौकशी झाल्यानंतर पैसे मिळतील, अशी उत्तरे दिली जातात़ या कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून गुंतवणूकदार व ठेवीदारांना दिल्या जात असलेल्या उत्तरांमुळे ते हवालदिल झाले आहेत़ कंपनीने शहरातील अनेक नागरिकांकडून पैसे जमा करून त्यांना गंडा घातला असून, कार्यालयही बंद केले आहे़त्यामुळे कंपनीने फसवणूक केल्याचे दिसत असून, या कंपनीवर कारवाई करून पैसे मिळवून देण्याच्या मागणीचे निवेदन गुंतवणूकदारांनी भद्रकाली पोलिसांना दिले. (प्रतिनिधी)