शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

आरोग्य विभागातील ३५ बदल्यांवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: May 23, 2014 01:09 IST

प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गासाठी मागविणार मार्गदर्शन

प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गासाठी मागविणार मार्गदर्शननाशिक : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यांच्या कार्यवाहीत गुरुवारी (दि.२२) आरोग्य विभागातील तीन संवर्गातील ३५ कर्मचार्‍यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातील कर्मचार्‍यांची बिगर आदिवासी भागात पदेच मंजूर नसल्याने त्याबाबत शासन मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी सांगितले.रावसाहेब थोरात सभागृहात सुखदेव बनकर यांच्या उपस्थितीत आरोग्य विभागातील बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. आरोग्यसेवक संवर्गातील बिगर आदिवासी भागातून आदिवासी भागात ७ कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. आदिवासी भागातून बिगर आदिवासी भागात ११ आरोग्यसेवकांच्या बदल्यांची कार्यवाही करण्यात आली. आरोग्य सहायिकांच्या ४ विनंती स्वरूपातील बदल्या करण्यात आल्या. प्रयोगशाळा तंत्रज्ञ संवर्गातील ५३ पदे मंजूर असताना प्रत्यक्षात ५ कर्मचार्‍यांच्या बदल्यांची कार्यवाही अपेक्षित होती. त्यापैकी आदिवासी भागात प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या जागा मंजूर आहेत, मात्र बिगर आदिवासी भागात पदेच मंजूर नसल्याने वर्षानुवर्षे त्यांना आदिवासी भागातच सेवा कराव्या लागतात. कर्मचार्‍यांची अडचण होते, ही बाब बदल्यांच्या कार्यवाहीप्रसंगी समोर आल्याने याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात येणार असल्याचे बनकर यांनी सांगितले. प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एकच जागा जयदर येथे रिक्त होती. त्या जागेवर गायत्री जाधव यांनी विनंती स्वरूपाची बदली मागितली. त्यांची करंजाळी येथील जागा रिक्त झाल्यावर त्या जागेवर दहिवड येथून सुरेखा चव्हाण यांनी बदली घेतली. कुळवंडी येथून दहिवडला भामरे यांनी विनंती बदली घेतली. त्यामुळे कुळवंडीची जागा रिक्त राहिली. बदल्यांच्या कार्यवाहीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विद्याधर कुलकर्णी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, कक्ष अधिकारी रवींद्र आंधळे आदि उपस्थित होते. शुक्रवारी (दि.२३) ग्रामपंचायत विभागातील कर्मचार्‍यांच्या बदल्यांची कार्यवाही होणार आहे.(प्रतिनिधी)