शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सात विद्यार्थी बसमधून पडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:50 IST

ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये पळत चढण्याच्या प्रयत्नात सात विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि. १५) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकास मारहाण करत काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलीस पथक दाखल झाल्यानंतर नागरिकांची समजूत काढल्यानंतर बससेवा पूर्ववत सुरू झाली.

पंचवटी : ओझरकडून नाशिकला येणाºया बसच्या चालकाने आडगाव थांब्यावर बस थांबविली नसल्याने धावत्या बसमध्ये पळत चढण्याच्या प्रयत्नात सात विद्यार्थी तोल जाऊन पडल्याची घटना शुक्र वारी (दि. १५) सकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर गावातील संतप्त नागरिकांनी बसचालकास मारहाण करत काहीकाळ बससेवा बंद पाडली होती. अखेर घटनास्थळी एसटीचे अधिकारी व पोलीस पथक दाखल झाल्यानंतर नागरिकांची समजूत काढल्यानंतर बससेवा पूर्ववत सुरू झाली. बसचालकाने बसथांब्यावर थांबविली नसल्यानेच हा प्रकार घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आडगावमधून नाशिकला नोकरी, शिक्षण, कामधंद्यासाठी मोठ्या प्रमाणात ये-जा करणारे प्रवासी आहेत. पूर्वी या मार्गावर मुबलक बस होत्या.जीवितहानी होता होता वाचलीआडगावातून अनेक विद्यार्थी तसेच नागरिक बसने प्रवास करतात. शुक्रवारी बसचालकाने थांब्यावर बस न थांबविल्याने विद्यार्थ्यांना धावत्या बसमागे पळावे लागले त्यामुळे अपघाताची घटना घडली. विद्यार्थी सावध असल्याने मोठा अपघात टळला. पुढच्या दरवाजाने विद्यार्थी बसमध्ये चढताना पडले असते तर त्यांना हकनाक जीव गमवावा लागला असता.काहीकाळ तणावाची परिस्थितीसकाळच्या सुमाराास आडगाव बसथांबा परिसरात ग्रामस्थांची वर्दळ असल्याने बसमधून विद्यार्थी पडल्याचे निदर्शनास येताच काही ग्रामस्थांनी त्या विद्यार्थ्यांना उचलले. त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बसचालकाला मारहाण करत आडगावातून सय्यद पिंप्री, सायखेडा, ओझर, विंचूर गवळी, मोहाडीकडे जाणाºया या बसेस रोखून धरत अर्धा ते पाऊण तास बससेवा बंद पाडली. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.