शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

युवकाच्या आत्महत्त्येप्रकरणी सात जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 14:11 IST

घोटी- इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील एका युवकाने रविवारी रात्री गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या युवकाला घरातील सदस्यानी मारहाण करीत शारीरिक व मानिसक छळ केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा आरोप मृत युवकाच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीत केल्याने सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

घोटी- इगतपुरी तालुक्यातील भंडारदरावाडी येथील एका युवकाने रविवारी रात्री गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, या युवकाला घरातील सदस्यानी मारहाण करीत शारीरिक व मानिसक छळ केल्याने आत्महत्येस प्रवृत्त केले असल्याचा आरोप मृत युवकाच्या पत्नीने घोटी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्र ारीत केल्याने सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, भंडारदरावाडी येथे प्रकाश विश्वनाथ सारूक्ते हा आपल्या आईवडील ,पत्नी, भाऊ, बहीण यांच्यासोबत राहत होता. दोन दिवसांपूर्वी प्रकाश याचे घरातील सदस्याचे किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण सोडविण्यासाठी रविवारी प्रकाश याचा साडू सोमनाथ गोडे हा आला होता.मात्र हे भांडण न शमता प्रकाशचे वडील विश्वनाथ सारु क्ते, आई भोराबाई सारु क्ते, भाऊ गिरीधर सारुक्ते, संतोष सारुक्ते,बहीण शोभा सारु क्ते यांच्यासह भारती सारूक्ते, लीला सारुक्ते आदींनी प्रकाश व सोमनाथ यास बेदम मारहाण केली.यात सोमनाथ हा गंभीर जखमी झाला.त्यास उपचारार्थ नजीकच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान ही मारहाण व छळ सहन न झाल्याने प्रकाश याने गावाजवळील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.याबाबत प्रकाशची पत्नी रोहिणी सारूक्ते हिने घरातील सदस्याच्या छळामुळे आत्महत्या केली असल्याची फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली असून पोलिसांनी सात जणांविरु द्ध गुन्हा दाखल केला त्यांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विलास घिसाडी, मिलिंद नाविगरे, हवालदार जगताप आदी करीत आहेत.