शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख मतदारांना मिळणार नवी ओळखपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:04 IST

नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कलावधीत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम ...

ठळक मुद्देनिवडणूक शाखा : सुरक्षिततेची काळजी घेऊन घरोघरी पोहोच करणार

नाशिक : नुकत्याच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या कलावधीत निवडणूक आयोगाने मतदारांसाठी नवीन रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम सुरू केली होती. त्यानुसार जिल्ह्णातील सुमारे सात लाख मतदारांना नवीन मतदार छायाचित्र ओळखपत्र प्राप्त होणार असून, मतदारांना ही ओळखपत्रे घरपोच दिले जाणार आहे.मतदानासाठी मतदाराचा पुरावा म्हणून छायाचित्र ओळखपत्र महत्त्वाचे असते. मतदारांकडे यापूर्वीच निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र असले तरी पूर्वीच्या ओळखपत्राचा गैरवापर अधिक होत होता. संगणकीय आणि कृष्णधवल ओळखपत्र असल्याने बनावट ओळखपत्र तयार करून त्याचा निवडणुकीत गैरवापर करण्याचा प्रकार सातत्याने समोर आल्याने निवडणूक आयोगाने सुरक्षित आणि रंगीत मतदार ओळखपत्र तयार करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार नवमतदारांना तसेच ज्यांनी ओळखपत्रातील बदलासाठी अर्ज केले आहेत त्यांच्यासाठी नवीन प्रकारचे मतदार छायाचित्र ओळखपत्र तयार करण्यात आलेले आहेत. निवडणुकीच्या काळातदेखील काही मतदारांना प्रायोगिक तत्त्वावर नवीन ओळखपत्रे देण्यात आलेली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात याबाबत अधिक जनजागृती करण्यात आल्याने नवीन मतदान ओळखपत्रांची अधिक मागणी नोंदविण्यात आल्यामुळे जिल्ह्णातील सुमारे ७,५९,७०० मतदारांना रंगीत छायाचित्र ओळखपत्र मिळणार आहे.यापूर्वी मतदारांना संगणकावर तयार करण्यात आलेले कृष्णधवल ओळखपत्र देण्यात आलेले आहे. आता आकर्षक रंगीत पॉलिमेरायझिंग विनाइकल क्लोराइड (पीव्हीसी) ओळखपत्र देण्यात येत आहे. ओळख पत्रासाठी अर्ज केल्यानंतर नवीन ओळखपत्राची प्रक्रिया सुरू होते. मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यामार्फत मतदारांना घरोघरी नवीन ओळखपत्र दिले जाणार आहे.च्नाव, पत्त्यातील बदल, लग्नानंतर नावात झालेला बदल, छायाचित्र बदलावयाचे असेल तसेच पत्ता बदललेला असेल अशा परिस्थितीत अर्ज करता येतो अशा मतदारांचे नवीन ओळखपत्र तयार होते. अर्ज केलेल्या मतदारांनाच नवीन ओळखपत्र देण्याची प्रक्रिया राबविली जाते.

टॅग्स :ElectionनिवडणूकVotingमतदान