शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

सात विद्यार्थिनींची प्रकृ ती खालावली

By admin | Updated: September 29, 2015 23:55 IST

विषबाधा प्रकरण : वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप

दिंडोरी : येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात ३१ मुलीना उलट्या व जुलाबाचा त्रास झाल्याने सोमवारी (दि. २८) त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी रु ग्णांच्या संख्येत वाढ झाली असून, मंगळवारी (दि. २९) आणखी पंधरा मुलींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी सात विद्यार्थिनींची प्रकृती खालावल्याने त्यांना अत्यवस्थ स्थितीत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही विषबाधा कोणत्या कारणाने झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विद्यार्थिनी गंभीर स्थितीत असतानाही रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक अधिकारी वेळेवर हजर होऊ शकले नसल्याने रुग्णालयातील एकंदर ढिसाळ कारभाराचा प्रत्यय यावेळी आला. विशेष म्हणजे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने पालक, पत्रकार व कार्यकर्ते यांच्या भेटीने मुलींची प्रकृती मानसिक दबाव येत असल्याने बिघडत असल्याचा जावईशोध लावला. त्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी (दि. २९) पंधरा मुलीना उलट्या, जुलाब, थंडी- तापाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात ललिता जाधव, हर्षदा झिरवाळ, प्रियंका झणकर, सुरेखा गायकवाड, लता गांगोडे, शैला डगळे, सुमित्रा राऊत, सविता खोटरे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या मुलींची प्रकृती गंभीर होत असताना केवळ परिचारिका वानखेडे या एकमेव उपचार करीत होत्या. वैद्यकीय अधीक्षक व अधिकारी यांना दूरध्वनीवरून संपर्क करून बोलावून घ्यावे लागले, तर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे फिरते पथक वरच्या वरच फिरकून गेले. प्रत्यक्ष वैद्यकीय अधीक्षक सूर्यवंशी यांनी फिरत्या पथकाला तिथेच थांबण्याचे आदेश देऊनही पथकाने ते जुमानले नाही. यावरून रुग्णालयावर कोणाचाही वचक नसल्याचा प्रत्यय आमदार नरहरी झिरवाळ यांनाही आला. झिरवाळ यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावूनही त्यांनी रुग्णालयात येणे टाळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. सद्यस्थितीत मालती पवार, कलावती गायकवाड, रेखा तुंगार, ललिता गायकवाड, तारा महाले, छाया गावंडे, कांचन राऊत या उपचार घेत आहे. परिस्थितीची दाखल घेत अप्पर आयुक्त अशोक लोखंडे, प्रकल्प अधिकारी गोलायीत, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, रासकर यांनी वसतीगृहातील विद्यार्थिनीची चौकशी करून या विद्याथीनींना अन्नातून विषबाधा झाली कि अन्य काही कारनास्तव उलट्या व जुलाबाचा त्रास झाला हे प्रयोगशाळेतील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल असे सांगितले. दरम्यान, या प्रकरणात विषबाधेचा स्पष्ट उलगडा होत नसल्याने परिसरात तर्कवितर्कांना उधान आले असून, सर्व शासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे पालक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे.तर वसतीगृहातील मुलीच्या विषबाधेच्या प्रकारामुळे दिंडोरीतील वस्तीगृहातील मुलांमध्यही घबराटीचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)